Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: :”मराठी भाषा विद्यापीठ जागतिक…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. राज्य शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 25, 2025 | 08:38 PM
Devendra Fadnavis: :”मराठी भाषा विद्यापीठ जागतिक…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक: रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासोबतच महानुभाव पंथाच्या समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी देशातील सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्यासोबतच समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. त्यांनी  आपल्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली,  महानुभाव विचारांबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजविण्याचे कामही केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उपयुक्त ठरले.

या काळात तयार झालेल्या साहित्यातून समकालिन महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, संस्कृतीची माहिती मिळते. ते सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा आहे. विविध आक्रमणे होऊनही महानुभाव विचार समाजात रुजूला. हा पंथ राज्य, देश आणि अफगाणपर्यंत विस्तारला आहे. या परंपरेने समतेचा विचार दिला. ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्त्वाची आहे.

#Maharashtra #DevendraFadnavis #MahanubhavPanth pic.twitter.com/XuE4oaeFHZ — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 25, 2025

भगवान चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजात प्रभू श्रीकृष्ण यांनी गीतेतून दिलेला विचार रुजविला, तोच संदेश समाजाला दिला. त्यांनी समाजाला सन्मार्गावर आणले. समाजात भेदाभेद, विषमता निर्माण झालेली असताना संपूर्ण समाजाला महानुभाव विचारातून एकसूत्रात बांधत त्यांना सन्मार्ग दाखविण्याचे काम चक्रधर स्वामी यांनी केले. मुख्यमंत्री झाल्यावर महानुभाव पंथाच्या स्थळांचा विकास सुरू केला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कारंजेकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे महानुभाव परिषदेचे विविध उपक्रम मार्गी लागले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. राज्य शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला.

🔸CM Devendra Fadnavis at the '38th Akhil Bhartiya Mahanubhav Parishad Adhiveshan'.
Minister Girish Mahajan, Minister Dadaji Bhuse, MLA Devyani Pharande and other senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची '38 वे अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन' येथे… pic.twitter.com/fP4YKEaIjA — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 25, 2025

फडणवीस यांच्या सहकार्यामुळे महानुभाव परिषदेचे विविध उपक्रम मार्गी लागले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. राज्य शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला.

Web Title: Cm fadnavis said mahanubhav parishad session a world renowned university built in riddhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government
  • marathi latest news

संबंधित बातम्या

हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’
1

हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’

Developed Maharashtra 2047: 8 शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार तर ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्था गाठणार; CM फडणवीसांचे ठरले लक्ष्य
2

Developed Maharashtra 2047: 8 शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार तर ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्था गाठणार; CM फडणवीसांचे ठरले लक्ष्य

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; तब्बल ‘इतक्या’ पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 24 कोटींचा बसला फटका
3

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’; तब्बल ‘इतक्या’ पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 24 कोटींचा बसला फटका

Nagpur News: आता संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवी ओळख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Nagpur News: आता संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवी ओळख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.