Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आचारसंहिता लागताच पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; एकाच दिवसात 4819 अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी निवडणुकीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर तात्काळ लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने ही धडक कारवाई सुरू केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 17, 2025 | 12:56 PM
पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात ४,८१९ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात ४,८१९ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवड शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, मंगळवारी (दि.१६) दुपारी तीन वाजेपर्यंत शहरभरातील तब्बल ४ हजार ८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स, बॅनर्स आणि फलकांवर कारवाई करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी निवडणुकीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर तात्काळ लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने ही धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि शासकीय इमारतींच्या परिसराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यामध्ये केवळ फ्लेक्सच नव्हे, तर राजकीय किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, पक्षांचे ध्वज, भिंतींवरील जाहिराती आणि फलक हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हेदेखील वाचा : Prithviraj Chavan : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही साहित्य लावू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

सर्वांनी नियमांचे पालन करावे

‘निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय राबविले असून, सर्वांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे’.

– श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

तातडीने कारवाई सुरू

आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कुठेही राजकीय जाहिरात फलक किंवा होर्डिंग राहू नयेत, यासाठी तातडीने कारवाई सुरू केली आहे. ही मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

– राजेश आगळे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

हेदेखील वाचा : वल्लभनगरमध्ये तरुणाचा जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दलाची धाडसी मोहीम; मोठी दुर्घटना टळली

Web Title: Code of conduct came into effect the administration in pimpri chinchwad went into action mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Pimpri-Chinchwad News

संबंधित बातम्या

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द
1

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द

Manikrao Kokate News:  माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल?
2

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल?

Bhosari Election News: भोसरीत निवडणुकीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे! जाळ अन् धूर संगटच निघणार
3

Bhosari Election News: भोसरीत निवडणुकीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे! जाळ अन् धूर संगटच निघणार

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात; ‘या’ प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
4

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात; ‘या’ प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.