
chhatrapati sambhajinagar
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. ‘ऑक्टोबर हिट’नंतर आता नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल सुरु झाली आहे. यात अनेक ठिकाणी शेकोट्या तर काही ठिकाणी याच थंडीपासून वाचण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग सहा महिने कोसळल्यानंतर पाऊस आता सर्वदूर थांबला आहे. पाऊस जाऊन आता गुलाबी थंडीही सुरु झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. सध्या कमाल 30 आणि किमान 12 अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरले आहे. काही ठिकाणी धुकेही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात तापमानात आणखी घट होऊन झोंबणारी थंडी सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. सध्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटायला सुरुवात झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहिला मिळत आहे.
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. त्यामुळे हलक्या पावसाची शक्यता असली तरी राज्यात पाऊस थांबणार आहे. सध्या विभागात आकाश स्वच्छ असून, वातावरणात कोरडेपणा वाढला आहे.
काही जिल्ह्यात किरकोळ पाऊस
काही जिल्ह्यात किरकोळ पाऊस झाला असला तरी इतर जिल्ह्यात आल्हाददायक वातावरण असून गुलाबी थंडीने आगमन सुरु केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसा उन्हाचा चटका जाणवत असून, रात्री गारवा वाढलेला आहे. यावर्षी उशिराने थंडी दाखल होत आहे.
थंडीचा कडाका वाढणार
शहरात कमाल 30 आणि किमान 12 अंशापर्यंत तापमान घसरले आहे. परिणामी अनेक ठिकाणी सायंकाळी शेकोट्यांचीही सुरुवात झाली आहे. यावर्षी मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली होती. ऋतुचक्र विस्कळीत झाल्यामुळे हिवाळा विलंबाने सुरू झाला आहे. यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्यामुळे जलसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. पाणी मुबलक असल्यामुळे रब्बी हंगामात बागायती क्षेत्र वाढणार आहे. परिणामी, थंडीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.
कोरड्या वातावरणामुळे थंडीत वाढ
कोरड्या वातावरणामुळे थंडीत वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळी आणि पहाटे थंडी चांगलीच झोंबू लागली आहे. या आठवड्यात तापमानात घसरण होऊन थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज आहे.
हेदेखील वाचा : थंडीची सुरुवात ! हिमाचल प्रदेशातील ताबोत तापमान पोहोचले उणे 2 अंशांपर्यंत; राजस्थानमध्येही तापमान घसरले