Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; ५१०३ बस फुल्ल

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2025 | 07:12 PM
एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी 8300 बसेस; 3×2 बसेस सव्वा वर्षांनंतर येणार सेवेत

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी 8300 बसेस; 3×2 बसेस सव्वा वर्षांनंतर येणार सेवेत

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : येत्या २७ ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या ४४७९ बसेस गट आरक्षणासह एकूण ५१०३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

 “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस

यावेळी सरनाईक यांनी सांगितले की, मुंबईतील कोणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर दरम्यान ५२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. “गणपती बाप्पा , मुंबईचे कोकणवासीय व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबईतुन कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच कोकणवासीयांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सरवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकर कोकणवासीयांच्या सेवेसाठी एसटी धावत असते”. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.

अर्थात गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. तसेच “सर्व गणेशभक्त प्रवाशांचा प्रवास सुखकर होवो!” अशा शुभेच्छा प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी दिल्या आहेत.

दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी ५१०३ बस फुल झाल्या आहेत. एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल

Web Title: Commuters overwhelming response to st to go to konkan for ganapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 07:12 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Konkan
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Terror Attack: ‘दाऊदचा उजवा हात, पाकिस्तानचा पाहुणा…’, २६/११ चा गूढ माणूस, पाकिस्तान १७ वर्षांपासून देते आसरा…
1

Mumbai Terror Attack: ‘दाऊदचा उजवा हात, पाकिस्तानचा पाहुणा…’, २६/११ चा गूढ माणूस, पाकिस्तान १७ वर्षांपासून देते आसरा…

मुंबई विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात १,०३६ एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स ची नोंद; प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ!
2

मुंबई विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात १,०३६ एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स ची नोंद; प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ!

Dombivali Crime: पलावा उड्डाणपुलाखाली सूटकेसमध्ये सापडला तरुणीचा सडलेला मृतदेह; अत्याचार करून हत्येचा संशय
3

Dombivali Crime: पलावा उड्डाणपुलाखाली सूटकेसमध्ये सापडला तरुणीचा सडलेला मृतदेह; अत्याचार करून हत्येचा संशय

BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले
4

BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.