कल्याण : राज्यपरिवहन मंडळाच्या बसेस आता नव्या रुपात झळकणार आहेत. विमानाप्रमाणे आता परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये देखील सेवा सुरु होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसेने नेते राजू पाटील यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. राजू पाटील यांनी किमान शब्दात राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई गोवा हायवेची चाळण झाली आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अपघात होत आहे. हे अपघात टाळण्यासाठी सरकारने आधी उपाय योजना करावी.मनसे नेते पाटील यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
मनसे नेते पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या घोषणाननंतर देशात असं काही झाले तर आनंदच आहे. हे होईल तेव्हा होईल. परंतु यानिमित्ताने राज्य सरकारला मात्र एक सांगावेसे वाटते की गणपतीसाठी एसटीने कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यात आता एसटीकडून आणि निवडणुकांच्या तोंडावर इच्छुक पण मोठ्या प्रमाणात कोकणवासीयांसाठी बसची व्यवस्था करून देतीलच.
आता विमानांसारख्या आलिशान बस येणार, एअर होस्टेसची जागा बस होस्टेस घेणार, केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरींची मोठी घोषणा….!
देशात असं काही झाले तर आनंदच आहे. हे होईल तेव्हा होईल परंतु यानिमित्ताने राज्य सरकारला मात्र एक सांगावेसे की गणपतींसाठी एसटी ने कोकणात जाणाऱ्यांची संख्या… pic.twitter.com/V14MpjmGsT
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 22, 2025
आधीच मुंबई-गोवा हायवेची झालेली चाळण आणि वाहतूककोंडीचा गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता कोकणवासीयांना बसने घरी पोहचायला चोवीस तास लागल्याचे पण समोर आले आहे. अशावेळी सरकारला विनंती आहे की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांची फिटनेस तपासणी करूनच त्या सोडण्यात याव्यात. तसेच प्रत्येक बससाठी एक एक पर्यायी चालक द्यावा. जेणेकरून चालक थकल्यावर सहचालक ड्रायव्हिंगची जबाबदारी सांभाळेल. त्याचबरोबर थकव्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात टळतील. म्हणूनच सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा अशी आशा मनसे नेते पाटील यांनी व्यक्त केली आहे.