मुंबई: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या शिंदे गटाला दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. त्यातच आता शिवसेना भवनाविरोधात (shivsena bhavan) धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. योगेश देशपांडे यांनी शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट (Shivai Trust)विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला कशी दिली? एका राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? असा सवाल योगेश देशपांडे(yogesh deshpande ) यांनी तक्रारीत विचारला आहे.
आतापर्यंत ही सगळी माहिती गोपनीय होती. सर्वसामान्यांचा असा समज होता, की ही शिवसेनेची जागा आहे. असाच माझाही समज होता. तशी गोपनियता बाळासाहेबांनीच ठेवली होती का? याबाबत मी अधिक माहिती घेतली असता ही जागा शिवाई ट्रस्टची असल्याची माहिती मिळाली. मग कोणत्याही ट्रस्टला जागा भाड्यावर देता येत नाही. एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली ? परवानगी नसताना राजकीय पक्षाचं कार्यलाय, इतके दिवस का वापरलं? असे प्रश्न योगेश देशपांडे यांनी विचारले आहेत.
कारवाई करा, अन्यथा नुकसान भरपाई करा, असे तक्रारीत सांगण्यात आले आहे. ‘शिवाई ट्रस्ट’ हे नाव ही सार्वजनिक ट्रस्ट असल्याचे नमूद करते. दुर्दैवाने तुमच्या कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटमधील तांत्रिक अडचणींमुळे, आम्ही आज वेबसाइटवरून अधिक माहिती मिळवू शकलो नाही.
शिवसेना आणि शिवाई ट्रस्टविषयी उपस्थित होणारे प्रश्न
या मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, आम्ही तुम्हाला विनंती करतो की हे पत्र सार्वजनिक हितासाठी आमची औपचारिक तक्रार मानून पुढील कारवाईसाठी तुमच्या निरीक्षकांना त्वरित अहवाल देण्याचे आदेश द्या, असे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
अनिल परब यांचं उत्तर
ज्यांनी शंका उपस्थित केली आहे, त्यांना कायदेशीर उत्तरे दिली जातील, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितलं. प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही बंधनकारक नाही. संबधित अधिकाऱ्यांना उत्तर देऊ, असे परब म्हणाले. सर्व कायदेशीर मार्गाने शिवसेना भवन उभं आहे, असे अनिल परब म्हणाले.