Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

मंगेश काळोखे हत्या प्रकरणात सोशल मीडियावरुन बदनामी केली जात असल्याचा आरोप केला. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर मागील 4 दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 02, 2026 | 05:26 PM
काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Follow Us
Close
Follow Us:
  • रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे राजकीय विरोधक
  • खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी अशी आमची भावना
  • काळोखे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात
कर्जत : खोपोलीतील मंगेश काळोखे हत्येची घटना अतिशय निंदनीय आहे. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असून त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. काळोखे कुटुंबाच्या दु:खात शिवसेना ठाकरे गट आणि आम्ही सर्वच सहभागी आहोत. प्रकरणात राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे राजकीय विरोधक आहेत. त्यांनी कर्जमध्ये पराभव केला, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत त्यांच्यासमोर निभाव लागणार नाही, हे स्पष्टपणे दिसत असल्याने महेंद्र थोरवे अशा गोष्टी करत आहेत. काळोखे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे आणि खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी अशी आमची भावना असल्याचे देखील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत म्हणाले.

नितीन सावंत यांनी कर्जत येथील शिवालय कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे स्थानिक नेते बाबू घारे आणि माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत यांनी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली. यावेळी मंगेश काळोखे हत्या प्रकरणात सोशल मीडियावरुन बदनामी केली जात असल्याचा आरोप केला. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर मागील 4 दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती. मात्र काही लोकांनी या घटनेचा वापर करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असल्याचे सावंत म्हणाले.

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, या हत्या प्रकरणानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही समाज माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी माध्यमांसमोर बाईट दिली नाही. कारण ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. पोलिसांनी आम्हाला विनंती केली. सोशल मीडियावर किंवा इतर कुठे व्यक्त होऊ नका, संयम बाळगा त्यानुसार आम्ही कुठे व्यक्त झालो नाही. पण काल परवा पासून ज्यांना दु:ख बाजूला ठेवून राजकारण करायचं आहे. त्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरु केलं आहे. अशी टिका यावेळी सावंत यांनी आमदार थोरवे यांच्यावर केली.

शिवसेना आणि शिवसैनिक यांना बाळासाहेबांनी सांगितले होते. माझ्यानंतर आदित्यला सांभाळा उद्धवला सांभाळा आज देखील इथे असणारा प्रत्येक शिवसैनिक आज पण त्याच विचारावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पक्षाच्या सर्वात कठीण काळात ठामपणे उभे आहेत. पण सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकणारे हे शिवसैनिक आहेत काय ? असा सवाल सावंत यांनी केला.

नितीन सावंत म्हणाले, आज जी घटना घडली त्यात राजकारण झालं नाही पाहिजे हे मनापासून वाटत होतं. पण आपल्या तालुक्याचा इतिहासच आहे, २००९ पासून प्रत्येक वेळी कुठल्या गावात घटना झाली की त्यात महेंद्र थोरवे यांनी नाहक त्यांच्या विरोधकांचे नाव गोवले. शिवसैनिकांवर वेगवेगळ्या केसेस मध्ये खोटे गुन्हे दाखल केले. तालुक्यात चुकीच्या घटनात राजकारण करायचे काम विरोधकांना गुंतविण्याचे काम करणऱ्या वृत्तीला ठेचण्याचं काम करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात मागील १० ते १५ वर्षे याच पद्धतीने ते काम करत आहेत, असा आरोप देखील यावेळी सावंत यांनी केला.

मंगेश काळोखे हत्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होईलच, पण महेद्र थोरवे राजकीय हेतूने सुधाकर घारे, भरत भगत यांच्यावर आरोप करत आहेत. राजकारणातील विरोधकांना संपविण्यासाठी थोरवे असे करतात. घारे यांनी कर्जत नगर परिषदेच्या निवडणूकीत थोरवे यांचा पराभव केला. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही. हे थोरवे .यांना स्पष्टपणे जाणीव आहे, येणाऱ्या काळात सत्य काय आहे ते जनतेसमोर येणारच आहे. त्या दिवशी थोरवे यांचा खरा चेहरा कर्जत खालापूरच्या जनतेसमोर येईल असे, नितीन सावंत म्हणाले.

खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी ही तटकरे यांची देखील भूमिका !

यावेळी बोलताना नितीन सावंत म्हणाले की, जे खरे आरोपी आहेत, त्यांना शिक्षा व्हावी, ही खासदार सुनील तटकरे यांची भूमिका आहे, आणि आमची देखील तीच भूमिका आहे. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. पोलिस प्रशासन काम करत आहे, सत्य हे सत्यच असते, ते समोर येणार आहे. पण एखाद्या घटनेचे किती राजकारण करावे ते प्रत्येकाला समजले पाहिजे.

… अन्यथा ५ हजार लोकांचा मोर्चा काढू !

यावेळी नितीन सावंत म्हणाले की, पोलिस प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालो नाही. पण ते जे करत आहेत. मात्र आमची सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे, हे थांबवले नाही तर पोलिस प्रशासना विरोधात ५ हजार लोकांचा मोर्चा आम्हाला काढावा लागेल.

Palghar News: खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून लघु उद्योजकाची आत्महत्या, गुन्हा दाखल

Web Title: Kaalokhe murder case conspiracy against sudhakar gharne shiv sena sub district chief nitin sawant allegations against mahendra thorve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • maharashtra
  • shivsena

संबंधित बातम्या

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम
1

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष
2

Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
3

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

BMC Election 2026: राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रचाराला वेग; मुंबईत 114 चा जादुई आकडा कोण गाठणार?
4

BMC Election 2026: राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रचाराला वेग; मुंबईत 114 चा जादुई आकडा कोण गाठणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.