Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Gogavale: “… नुकसान टाळण्यासाठी ठोस निर्णय घेणार”; मंत्री भरत गोगावले

खाड्यांमधून खारं पाणी शेतीमध्ये घुसल्याने भातशेतीसह मच्छीपालनही बाधित झाले आहे. ही समस्या केवळ शहापूरपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील खाडी किनाऱ्यावरील गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2025 | 02:35 AM
Bharat Gogavale: “… नुकसान टाळण्यासाठी ठोस निर्णय घेणार”; मंत्री भरत गोगावले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: रायगड जिल्ह्यातील शहापूर परिसरातील खारभूमीमध्ये शेती व मच्छीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींवर राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत असून, सर्व संबंधित खात्यांची संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, अशी माहिती खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी विधानपरिषदेत आज दिली. सदस्य प्रवीण दरेकर यांनी अर्धातास चर्चेदरम्यान रायगड जिल्ह्यातील शहापूर येथील समस्येविषयी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री गोगावले बोलत होते.

मोठा पाडा (शहापूर) योजनेचे एकूण क्षेत्र – ४२३ हेक्टर असल्याचे सांगून मंत्री गोगावले म्हणाले की, त्यापैकी ३८७.५१ हेक्टर जमीन एमआयडीसीने संपादित केलेली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून एमआयडीसीने या भागात जागा संपादित केली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती आणि उपजीविकेवर झाला आहे.

Sindhudurg Politics: महायुतीत मिठाचा खडा; भरत गोगावलेंच्या विधानाने सिंधुदुर्गात राजकारण तापलं

खाड्यांमधून खारं पाणी शेतीमध्ये घुसल्याने भातशेतीसह मच्छीपालनही बाधित झाले आहे. ही समस्या केवळ शहापूरपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील खाडी किनाऱ्यावरील गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे. शेतकरी उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत गंभीर असून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा विषय उद्योग, पर्यावरण, महसूल, वन आणि एमआयडीसी या चार विभागांशी संबंधित आहे. लवकरच या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची, स्थानिक आमदारांची, शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठोस निर्णय घेतला जाईल असेही मंत्री गोगावले यांनी सांगितले.

भरत गोगावलेंच्या विधानाने सिंधुदुर्गात राजकारण तापलं

शिवसेना नेते भरत गोगावले यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर कोकणात भाजप आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह सरचिटणीसांनी माफी मागा त्यानंतरच युतीवर चर्चा होईल, असा शिंदे गटाला इशारा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात राजकारण चांगलचं तापलं आहे. शिवसेना शिंदे गटाचा नुकताच मेळावा पार पडला. या मेळाव्यात नारायण राणेंनी केसेस अंगावर घेतल्या, मर्डर, भानगडी झाल्या, प्रसंगी ते जेलमध्येही गेले, भानगडी केल्या, ते असेच मोठे झाले नाहीत. असं विधान केलं होतं. या मेळाव्यात मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे उपस्थित होते. पण गोगावलेंच्या या विधानाने वादाची ठिणगी पडली.

मंत्री गोगावले म्हणाले की, खारभूमीतील पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर मंग्रोव्ह (खारफुटी) उगवू लागले असून, त्यामुळे शेती अडचणीत आली आहे. मंग्रोव्ह संरक्षित असल्याने वनखात्याचे निर्बंध लागू होतात आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीवरही शेती करता येत नाही. याविषयीही बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.

Web Title: Concrete decisions will be taken to prevent agricultural damage caused by salt water said by bharat gogavle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Fishery
  • raigad

संबंधित बातम्या

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
1

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट
2

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात
3

Khopoli : खोपोलीत पोलिसांची कारवाई! हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, १७ जण ताब्यात

Raigad : चंद्रकांत पाटील यांनी लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठाचा घेतला आढावा
4

Raigad : चंद्रकांत पाटील यांनी लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठाचा घेतला आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.