Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

मोदी-फडणवीसांनी शेतकऱ्यांची उघड फसवणूक केली आहे, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2025 | 06:15 PM
मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनसाठी केवळ ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. परंतु २०१३ साली भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ६,००० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्या दिंडीला आज १२ वर्षे झाली, आणि मोदी सरकार सत्तेत येऊन ११ वर्षे उलटली तरीही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ६,००० रुपये प्रतिक्विंटल हमी भाव मिळालेला नाही. मोदी-फडणवीसांनी शेतकऱ्यांची उघड फसवणूक केली आहे, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सावंत म्हणाले, २०१३ साली जेव्हा फडणवीस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढत होते, तेव्हा त्यांचा आवाज व भावन खरी होती की केवळ राजकारणाचा भाग होता, असा प्रश्न आता जनतेसमोर आहे. आज ते सत्तेत आहेत, त्यांनी स्वतः केलेल्या मागणीप्रमाणे भाव मिळवून दिला नाही. हेच भाजपच्या उक्ती आणि कृतीतील दुटप्पीपणाचे ठळक उदाहरण आहे. आज बाजारात शेतकरी आपले सोयाबीन फक्त ३५०० रुपये प्रति क्विंटल दराने विकत आहेत. म्हणजेच प्रत्येक क्विंटलमागे शेतकऱ्यांना १८०० ते २००० रुपये इतके थेट नुकसान होत आहे. त्यातही हमीभाव केंद्र सुरू करण्यात सरकारकडून जाणूनबुजून दिरंगाई केली जात आहे. यंदा खरेदी केंद्रांच्या वाटपातही नवा ‘वाटेकरी’ आणून गोंधळ निर्माण करण्यात आला आहे. पूर्वी पणन महासंघाकडे असलेले अधिकार आता राजकीय दबावाखाली विभागले गेले असून, त्यामुळे खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होत आहे.

पुढे बोलतांना सावंत म्हणाले, अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, कापूस, कांदा, उत्पादन पूर्णपणे नष्ट झाले, सोयाबीनचे उत्पादन घटले आणि भाव कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरलेले नाही. सरकारने दिवाळीपूर्वी मदत देऊ अशी घोषणा केली, पण त्या घोषणा हवेत विरल्या. परिणामी, बळीराजाची दिवाळी अंधारात गेली आहे.

पूर्वी दिवाळीपूर्वीच हमीभाव केंद्रातून खरेदी सुरू व्हायची. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहता सरकारने किमान महिनाभर आधी केंद्र सुरू करायला हवे होते. पण सरकार हातावर हात धरून बसले आहे. खरीपाचे उत्पादन बुडाले तरी भाव वाढले नाहीत, उलट कमी होत आहेत. भाजपसाठी सत्ताच सर्वस्व आहे. शेतकरी त्यांच्या दृष्टीने माणूस नाही, फक्त मतदार आहे. निदान मतदार म्हणून तरी त्यांना मदत करा, असे सचिन सावंत म्हणाले.

हे सुद्धा वाचा : स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम; सपकाळांनी साजरी केली अनोखी दिवाळी

Web Title: Congress alleges that prime minister modi and chief minister fadnavis cheated soybean farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Farmers
  • PM Narendra Modi
  • sachin sawant

संबंधित बातम्या

कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन; नेमकं मागणी काय?
1

कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन; नेमकं मागणी काय?

स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम; सपकाळांनी साजरी केली अनोखी दिवाळी
2

स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम; सपकाळांनी साजरी केली अनोखी दिवाळी

राज्यासमोर मोठं संकट! ‘या’ आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क
3

राज्यासमोर मोठं संकट! ‘या’ आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; राज्यभरात आंदोलन पेटणार
4

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; राज्यभरात आंदोलन पेटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.