Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्षक चौकातील उड्डाणपुलाचा उतार धोकादायक, उपाययोजना न केल्यास…; खासदार श्रीरंग बारणेंचा इशारा

पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौक येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2026 | 06:13 PM
रक्षक चौकातील उड्डाणपुलाचा उतार धोकादायक, उपाययोजना न केल्यास...; खासदार श्रीरंग बारणेंचा इशारा

रक्षक चौकातील उड्डाणपुलाचा उतार धोकादायक, उपाययोजना न केल्यास...; खासदार श्रीरंग बारणेंचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • रक्षक चौकातील उड्डाणपुलाचा उतार धोकादायक
  • उपाययोजना न केल्यास परिणामांना तयार राहा
  • खासदार श्रीरंग बारणेंचा अधिकाऱ्यांना इशारा
पिंपरी : पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौक येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या पुलाचा उतार तांत्रिकदृष्ट्या अत्यंत तीव्र असून तो भविष्यात अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. या त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यास आणि अपघातात जीवितहानी झाल्यास संबंधित सल्लागार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे. खासदार बारणे यांनी गुरुवारी या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

 

यावेळी महापालिकेच्या सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, सल्लागार डॉ. संजय नाईक, कार्यकारी अभियंता सुनील पवार, संध्या वाघ, उपअभियंता निलेश दाते, कनिष्ठ अभियंता प्रणिता पिंजन आदी उपस्थित होते.

निगडीतील अपघातांची पुनरावृत्ती टाळा

पाहणीदरम्यान बारणे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “यापूर्वी निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाचा उतार तीव्र झाल्याने तिथे सातत्याने भीषण अपघात होत आहेत. तीच चूक रक्षक चौकात होताना दिसत आहे. सल्लागार आणि अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. पुलाची लांबी वाढवून हा उतार तातडीने कमी करण्यात यावा.” या कामाचा खर्च, तांत्रिक माहिती आणि आराखड्याचा फेरविचार करून तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हा उड्डाणपूल कार्यान्वित झाल्यानंतर सांगवी फाटा ते रावेत दरम्यानचा प्रवास सिग्नलविरहित होणार असून इंधन आणि वेळेची बचत होईल. मात्र, ‘विकासासोबत सुरक्षा’ महत्त्वाची असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : बारामती नगरपरिषदेचा 551 कोटी 73 लाखांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

पुलाची वैशिष्ट्ये आणि सुविधा :

लांबी व रुंदी : ३४५ मीटर लांब आणि २६.४ मीटर रुंद.

उंची : ५.५ मीटर.

स्वतंत्र मार्ग : पिंपळे निलखकडून येणाऱ्या वाहनांसाठी खालच्या बाजूने स्वतंत्र मार्ग.

लष्करी वाहतूक : सैन्य दलाची वाहने आणि पीएमपीएमएल बससाठी पुलाखाली विशेष सोय.

उपाययोजना न केल्यास परिणामांना तयार राहा

“पुलाचा उतार तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्यास तो तातडीने दुरुस्त करा. योग्य संकेतचिन्हे आणि उपाययोजना न करता पूल खुला केल्यास परिणामांना तयार राहा,” असा स्पष्ट इशारा खासदार बारणे यांनी यावेळी दिला.

हे सुद्धा वाचा : पुणे- अहिल्यानगर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी; प्रवाशांसह स्थानिक नागरिक त्रस्त

Web Title: Shrirang barne has warned the authorities about the flyover work at rakshak chowk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri
  • Shrirang Barne

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
1

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल
3

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
4

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.