सध्या राजकारणाची नव्हे; एकसंघ राहण्याची वेळ - हर्षवर्धन सपकाळ
नागपूर : केंद्र सरकारने देशामध्ये जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. 2011 मध्ये शेवटची जनगणना झाली असून सध्याच्या परिस्थितीमध्ये देशातील नागिरकांची पूर्ण माहिती असणे आवश्यक झाले आहे. जातिनिहाय जनगणनेची मागणी कॉंग्रेसकडून केली जात होती. यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या पदयात्रेमधून देखील त्यांनी हा मुद्दा मांडला होता. यानंतर आता जातिनिहाय जनगणनेचा निर्णय झाल्यामुळे विरोधकांनी आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी जातिनिहाय जनगणनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “जातिनिहाय जनगणना याची पार्श्वभूमी पाहिली तर राहुल गांधी यांचा हा मोठा विजय आहे. सरकारचे अनेक जुमले आपण पाहिले तसा हा जमला असू नये, असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे. हा निर्णय घेण्यासाठी राहुल गांधी यांनी भाग पाडले. सरसंघचालक, योगी आणि काही खासदारांनी जनगणना नको म्हणाले होते. जात की बात करुंगा उसे लाथ दुंगा असे हे लोक म्हणाले,” अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुती सरकारने प्रशासकीय कामकाज आणि विकासकामांसाठी 100 दिवसांच्या कार्यकाळातील कामरकाजाचे आयोजन केले होते. त्याचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यावरुन आता कॉंग्रेसने टोला लगावला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “हे सरकार निवडून येताना मताची चोरी करून निवडून आलं आहे.75 लाख मत कुठून आली याच उत्तर यांनी अजून दिलं नाही. खोक्या आणि बेताल वक्तव करणारे मंत्री या सरकारच्या शंभर दिवसांच्या काळात आपण पाहिले. त्यामुळे या शंभर दिवसात जनतेच्या अपेक्षाच भंग झाला आहे,” असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “रिलायन्स सारख्या कंपनीला लाभ देणे हा योजनेचा उद्देश आहे. काँग्रेसने संघटना वर्ष जाहीर केले. त्यानुसार आवश्यक बदल सुरू केले आहे. हे संघटना वर्ष असल्याने फेरफार आणि आवश्यक बदल वर्षभरात होणार, असे मच सपकाळ यांनी व्यक्त केले. तसेच पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या सोबत राहण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत झाला आहे. देशात विदेशात भारत एक देश एक आहे. हे दाखविण्यासाठी सरकारने अधिवेशन बोलवावं ही काँग्रेसची भूमिका आहे,” असे मत महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्क्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.