विधानसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसकडून पटोलेंची उचलबांगडी; हर्षवर्धन सपकाळांकडे दिली प्रदेशाध्यक्षपदाची जवाबदारी
मुंबई: गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर कॉँग्रेस पक्षाला देखील मोठा फक्त बसला आहे. महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल झालेले पाहायला मिळत आहेत. नाना पटोले हे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आता त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले आहे. आता महाराष्ट्र कॉँग्रेसची धुरा ही हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर असणार आहे. कॉँग्रेस हायकमांडने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर महाराष्ट्र कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जवाबदारी सोपवली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे कॉँग्रेसचे माजी आमदार आहेत. 2014 ते 2019 ते बुलढण्याचे आमदार राहिले आहेत. 2019 मध्ये ते निवडणुकीत उभे राहिले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. हर्षवर्धन सपकाळ हे सध्या कॉँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ग्राम स्वच्छता अभियान आणि ग्राम चळवळ यामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे.
एक बेहतरीन निर्णय!
श्री हर्षवर्धन सपकाल जी को बधाई!लंबे समय से कांग्रेस संगठन में सक्रिय हर्षवर्धन जी के नेतृत्व में @INCMaharashtra संगठन को पुनः मजबूती मिलेगी।
शुभकामनाएं @harshsapkal जी pic.twitter.com/aj74Y0r3AT
— Srinivas BV (@srinivasiyc) February 13, 2025
हर्षवर्धन सपकाळ यांची कारकीर्द
सामाजिक क्षेत्रातील योगदान
1) गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारीत ग्राम-स्वराज निर्माण
2) सर्वोदय विचारांवर आधारीत राष्ट्रनिर्माण युवक शिबिरे
3) ग्रामस्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय योगदान
4)जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्पांची अंमलबजावणी.
5)आदिवासी समुदायाचे तथा गावांचे सक्षमीकरण
राजकीय क्षेत्रातील योगदान
1) विद्यामान राष्ट्रीय अध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संगठन
2) जेष्ठ पक्ष निरिक्षक – ओडिसा लोकसभा/विधानसभा 2024
3) राष्ट्रीय सचिव- अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली- सह प्रभारी गुजरात- मध्यप्रदेश -पंजाब (दहा वर्ष)
4) राष्ट्रीय उपाध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संगठन
5) माजी अध्यक्ष- जिल्हा परिषद बुलढाणा (1999 ते 2002)
6) माजी विधान सभा सदस्य- 22 बुलडाणा विधानसभा (2014 ते 2019)
7) माजी सदस्य- जिल्हा परिषद बुलढाणा (1997 से 2006)
8) शिबिर समन्वयक- गांधी विचार दर्शन सेवाग्राम (अ.भा.काँ.कमिटी द्वारा आयोजन)
9) पक्ष निरिक्षक- अनेक राज्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने.
10)माजी उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फक्त बसला. त्यामध्ये कॉँग्रेसला देखील खूप जागांवर नुकसान झाले आहे. अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव देखील झाला. त्यानंतर कॉँग्रेसहायकमांडने मोठे बदल महाराष्ट्र कॉँग्रेसमध्ये केले आहेत. त्यामुळे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे आता नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत.
हर्षवर्धन वसंतराव सपकाळ
युवावस्थेपासूनच गाडगे महाराज,तुकडोजी महाराज व गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबध्दता दर्शविते. तसेच ही एक फार मोठी उपलब्धी समजली जाते. शेतीस्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.