प्रदेशाध्यक्षपदावरुन महाराष्ट्र काँग्रेस पदावरुन राजकारण सुरु झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीचा निवडणुकीमध्ये एकतर्फी आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामुळे नेते नाराज आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष पद सोडतील अशी चर्चा सुरु होती. यामुळे आता महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरुन राजकारण आणि दावे सुरु झाले आहेत.
कॉंग्रेसचे सध्या नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र त्यावरुन अनेकांनी यापूर्वी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता विधानसभेमध्ये पराभव झाल्यामुळे नाना पटोले हे पद सोडतील अशी चर्चा होती. आक्रमक व विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा नवीन प्रदेशाध्यक्षाची काँग्रेसला गरज असून त्याचा शोध सुरू असल्याचा राजकीय गौप्यस्फोट नागपूर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली आहे. पक्ष मला संधी देईल तर मला नक्कीच प्रदेशाध्यक्ष बनायला आवडेल अशी इच्छा देखील नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले नितीन राऊत?
नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत वक्तव्य केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी प्रक्षश्रेष्ठीकडे प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मात्र त्यामुळे पक्षात मरगळ आली, असे म्हणता येणार नाही. निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करत आहे. सध्या नाना पटोले हे विधिमंडळ गट नेता पदाच्या भूमिकेत गेले आहे. मात्र ते पद त्यांना मिळेल का हे पक्षश्रेष्ठी ठरवेल, असे ही यांनी सांगितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेसचे सध्या नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असले तरी देखील त्यांनी पद सोडण्याचे वक्तव्य केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत हाय कमांडला सांगितले असल्याचे देखील वक्तव्य केले होते. नाना पटोले यांनी स्वत: यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं होतं. मी पद सोडलेलं आहे, मी हाय कामंडला ही सांगितले आहे की मला मुक्त करा. अशा शब्दात नाना पटोलेंनी यावर भाष्य केलं होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस वेगळ्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली निवडणूका लढवणार असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असल्याचे पुढे आल्यानंतर या पदासाठी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत, तर या पदासाठी तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देणार का की जुन्या जाणत्या नेतृत्वाला संधी दिली जाईल, याची चर्चा रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री झाल्यानंतर भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.