Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस सरकारने अफजल गुरु, कसाबला फाशी देऊन जेलमध्येच गाडले, पण भाजपा सरकारने…; अतुल लोंढेंची टीका

अमित शाह यांनी आज संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर, पहलगामनंतर पाकिस्तानबरोबर झालेला संघर्ष यावरुन भाष्य करताना काँग्रेसवर निशाणा साधला. यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 29, 2025 | 05:10 PM
काँग्रेस सरकारने अफजल गुरु, कसाबला फाशी देऊन जेलमध्येच गाडले, पण भाजपा सरकारने...; अतुल लोंढेंची टीका

काँग्रेस सरकारने अफजल गुरु, कसाबला फाशी देऊन जेलमध्येच गाडले, पण भाजपा सरकारने...; अतुल लोंढेंची टीका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यात आले होते. यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली होती. या पार्श्वभूमीवर कालपासून लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर, पहलगामनंतर पाकिस्तानबरोबर झालेला संघर्ष यावरुन भाष्य करताना काँग्रेसवर निशाणा साधला. यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ऑपरेशन सिंदूरविषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच कुख्यात अतिरेक्यांना कंदहारला सोडून आले. पाकिस्तानी आयएसआयला पठाणकोटला बोलवण्याचे पापही भाजपा सरकारनेच केले. खरे पाहता देशाशी गद्दारी करण्याचे काम भाजपा सरकारनेच केले आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

अमित शाह यांच्या निवेदनाचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले की, अमित शाह यांनी काँग्रेस सरकारवर खोटे आरोप केले, काँग्रेस सरकार असताना अतिरेक्यांचे मृतदेह परत दिलेले नाहीत. अफजल गुरु व कसाबला फाशी दिली व जेलमध्येच गाडले. या उलट १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला २०१५ साली फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह मेमनच्या कुटुंबियांना देण्यात आला याची माहिती अमित शाह यांनी घ्यावी. हुर्रियत काँन्फरन्सबरोबर वाजपेयी सरकारनेच सर्वात जास्त चर्चा केली आहे पण अमित शाह मात्र काँग्रेसवर आरोप करत आहेत. डॉ. मनमोहनसिंह यांचा जन्म पाकिस्तानातील, ते १० वर्षे पंतप्रधान होते पण ते पाकिस्तानला गेले नाहीत पण नरेंद्र मोदी आमंत्रण नसताना पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. नरेंद्र मोदींनी शपथविधीलाही नवाज शरिफ यांना आमंत्रण दिले होते, याची आठवण लोंढे यांनी करून दिली.

ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान फक्त पुढे होता खरा सुत्रधार तर चीन होता, तोच सर्व करत होता असे लष्कराचे उपप्रमुख राहुल के. सिंग यांनी सांगितले आहे. पण अमित शाह यांनी चीनचे नाव घेण्याची हिम्मत दाखवली नाही. संयुक्त राष्ट्राच्या मुद्द्यावर बोलतानाही अमित शाह खोटे बोलले. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही १९४५ साली झाली व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन व रशिया हे त्याचे सदस्य होते, त्यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता असेही अतुल लोंढे यांनी सांगितले.

Web Title: Congress leader atul londhe has criticized union home minister amit shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Atul Londhe Congress
  • BJP
  • Congress

संबंधित बातम्या

महाविकास आघाडीची भाकरी भाजणार की करपणार! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात
1

महाविकास आघाडीची भाकरी भाजणार की करपणार! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा
2

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंचे रक्त सांडले! प्रियांका गांधी अस्वस्थ; न्यायाच्या मागणीला काँग्रेसचा आक्रोशाचा स्वर
3

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंचे रक्त सांडले! प्रियांका गांधी अस्वस्थ; न्यायाच्या मागणीला काँग्रेसचा आक्रोशाचा स्वर

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार
4

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.