Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसने केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; निवडणूक आयोगावरही केले आरोप

भाजपाची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 24, 2025 | 04:10 PM
काँग्रेसने केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; निवडणूक आयोगावरही केले आरोप

काँग्रेसने केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; निवडणूक आयोगावरही केले आरोप

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुल गांधी यांनी सातत्याने या मतचोरीचे प्रकरण लावून धरले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघातील मतांचा घोळ उघड केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढल्याचे उघड झाले आहे. भाजपाची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदारयादीत अवघ्या ५ महिन्यांत ८% वाढ झाली आहे, काही बूथवर ही वाढ २०-५०% झालेली दिसत आहे. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे बीएलओंनी नोंदवले आहे पण निवडणूक आयोग मात्र गप्प असून ही मतचोरीच आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाने मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी केलेली आहे.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या भाजपा युतीला अवघ्या पाच महिन्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय कसा मिळू शकतो, हाच कळीचा प्रश्न आहे. या पाच महिन्यात भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदारयाद्यात घोळ केला, मतदानाची संख्या वाढवली. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर झालेले मतदान व दुसऱ्या दिवशी जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यात तब्बल ८ टक्क्यांची तफावत आहे. हे मतदान कसे वाढले, याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही. उलट आता माहितीच देता येणार नाही असा नियम बनवला तसेच ४५ दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निर्णयही घेतला आहे. हे सर्व मतचोरी लपवण्याचा प्रकार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded the resignation of devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Election
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे
3

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी
4

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.