Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला, तर निलंबनाचे…; पटोलेंनी ठणकावून सांगितलं

एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 01, 2025 | 04:35 PM
शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला, तर निलंबनाचे...; पटोलेंनी ठणकावून सांगितलं

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला, तर निलंबनाचे...; पटोलेंनी ठणकावून सांगितलं

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल, आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही, असा घणाघाती हल्ला करत शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

शेतकरी प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर नाना पटोले यांना विधिमंडळातून एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले, त्यानंतर विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष आहे. भाजपा युती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेहमीच शेतकऱ्यांचा अपमान करतात, आधी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली. नंतर कर्जमाफीचे पैसे मुलामुलींच्या लग्नाला वापरा अशी वायफळ बडबड केली तर आता बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला. शेतकऱ्याला पेरणीला पैसे मोदी देतात, शेतकऱ्यांच्या घरच्यांना कपडे, मोबाईल हेही मोदी देतात असे विधान केले. २०१४ च्या आधी लोणीकर कपडे घालत नव्हते काय?, नंगे फिरत होते का?, असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतमालाला हमी भाव देऊ, शेतीला २४ तास मोफत वीज देऊ अशी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि आता शेतकऱ्यांचा अपमान करतात. हा सत्तेचा माज आहे पण आम्ही शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. शेतकऱ्यांची लढाई लढत राहणार, आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न डगमगता शेतकऱ्यासाठी लढत राहू. शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या बबनराव लोणीकर व मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, असेही नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा : ‘मी त्यांच्यासारखा 150 दिवस पळून गेलो नाही’; धनंजय मुंडेंच्या आरोपावर संदीप क्षीरसागरांचा पलटवार

Web Title: Congress leader nana patole has reacted after being suspended for a day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • babanrao lonikar
  • CM Devedra Fadnavis
  • Nana patole
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
1

शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम
2

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर
3

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर

Honey Trap Case : भाजपच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; महिलेने अश्लील फोटो पाठवले अन्…
4

Honey Trap Case : भाजपच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; महिलेने अश्लील फोटो पाठवले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.