Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंच्या समर्थकाला इशारा, म्हणाले; फक्त तू…

गोविंद फड यांनी केलेल्या पोस्टवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी मुंडेंसह फड यांच्यावर निशाणा साधला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2026 | 12:45 PM
मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंच्या समर्थकाला इशारा, म्हणाले; फक्त तू...

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंच्या समर्थकाला इशारा, म्हणाले; फक्त तू...

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : विविध घटनामुळं सध्या बीड जिल्हा चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील आरोप- प्रत्यारोप सर्वांनाच माहित आहे. अशातच माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असणारे गोविंद फड यांची फेसबुक वरील पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय, अशी पोस्ट गोविंद फड फेसबुकवर पोस्ट केली आहे. गोविंद फड यांनी केलेल्या पोस्टवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

 

जरांगे पाटील म्हणाले, मी माझ्या समाजाला देव माय- बाप मानलं आहे. माझी संपत्ती तुम्ही आहे मी आयुष्यात एक रुपया कमविला नाही, माझे मायबाप तुम्ही आहात. मी पण डावावर लागलो. माझे कुटुंब पण डावावर लागलंय. कधी मारून टाकतील मला आणि माझ्या कुटूंबाला तरी मी हटत नाही. मी रात्रंदिवस बाहेर आहे. कोणाला यायचे त्याला येऊ द्या, आम्ही समर्थ आहे. तू कोणत्याही गावात ये राज्यातल्या प्रत्येक गावात माझा मराठा आहे. फक्त तू ये. धमक्या देऊ नको. यावं करणार आहे त्याव करणारं, या धमक्या नको देऊ. काल कुणीतरी म्हणालं, ते धनंजय मुंडे याचं कुणीतरी ते म्हणाले भंडारा लावून मारून टाकतो. तू भंडारा लाव नाहीतर गुलाल काहीही लाव. मी मरायला भीत नाही. माझी कधीपण तयारी आहे. माझा समाज पण सज्ज आहे, असा इशारा त्यांनी फड यांना दिला. का मारायचं तर गरिबांच काम करतो हेच कारण ना. समाजाने एकजुटीने रहा, खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्या क्षेत्रात अडचणी आहेत त्या क्षेत्रात सुध्दा मी एक यंत्रणा उभा करायला लागलोय. मी समाजाला सांगितलेले आहे. चार पाच दिवसानंतर राज्यभरातील एक वर्षासाठी दौरे पूर्णपणे बंद करणार आहे. तुम्हाला आरक्षण दिलंय, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टेंशन नाही. तुम्हाला आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करतोय. महाराष्ट्रातील कोणत्याही कोनाकोपर्‍यात अडचण आली तर 15 मिनिटात माणूस तुमच्या मदतीला आला पाहिजे.

शेतकर्‍यांचं कर्ज माफ करतो

मी एकदा मुद्दा घेतला की आपण एकदा माग लागलो की पाणी काढूस्तोवर माग सरकत नाही मग जे व्हायचं असतो असू दे. शेतकरी म्हणून आंदोलनात उतरा. शेतकर्‍यांनी सुध्दा पुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये गटतट नसले पाहिजेत, तरच त्यांना न्याय मिळेल. तुमचं कर्ज ठेवत नाही. या पवित्र व्यासपीठावरुन आजच शब्द देतो, तुमचं कर्ज ठेवत नाही, तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते बघतो. तुमच्या पीक विम्याचे पैसे कसे काय मिळत नाही ते बघतो, तुमच्या दुधाला कसा भाव मिळत नाही ते पण आपल्याकडे लागलं. तुम्ही फक्त टेंशन नाही घ्यायचे.

सगेसोयऱ्याचा विषय लवकरच निकाली

ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मोर्चा घेऊन गेलो होतो वाशीला तिथे सांगितले सग्यासोयऱ्यांची अधिसूचना काढली. आता हरकतीची छाननी करेपर्यंत तीन चार महिने लागणार आहेत तोपर्यंत आपण मराठ्यांच्या पोरींना मोफत शिक्षण करू. मी जर जातीवादी असतो ना तर हो फक्त मराठ्याच्याच पोरीला मोफत शिक्षण हवे अशी मागणी केली असती. मी त्यावेळी सांगितले सगळ्या जातीच्या लेकीबाळीना मोफत शिक्षण करा आणि तो जीआर मंजूर करून घेतला. आता आरक्षणाचा पश्चिम महाराष्ट्राचा नंबर आहे. मला वाटतंय 7 तारखेपर्यत काय तरी खालीवर करतील, नाही केलं तर मी त्यांच्या मागे लागणार आहे सांगितले आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

Web Title: Maratha protester manoj jarange patil has warned a supporter of dhananjay munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • dhananjay munde news
  • Manoj Jarange Patil

संबंधित बातम्या

शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी
2

पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?
3

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे
4

महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.