Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेसला संशय? हा कॉम्पुटर गेम म्हणत नाना पटोलेंचे वादग्रस्त विधान

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त विधान केले. यावरुन आता वातावरण तापले आहे. या लष्करी कारवाईला ते कॉम्पुटर गेम म्हणाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 12, 2025 | 11:44 AM
Congress nana patole Controversial statement operation sindoor as computer game

Congress nana patole Controversial statement operation sindoor as computer game

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारताने मागील महिन्यामध्ये पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पाकिस्तानमधील दहशतवादावर वचक बसवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर केले. याअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. यावेळी काँग्रेस पक्षाने सरकारसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. आता मात्र काँग्रेसने नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत संशय घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.

भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा संगणकावरील व्हिडीओ गेम होता. भारताने हल्ल्याआधीच पाकिस्तानला पूर्वकल्पना दिल्याने पाकिस्तानने आपली माणसं तिथून (जिथे हल्ला केला जाणार होता ती ठिकाणे) हटवली. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारावरून धमकी दिल्‌यानंतर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर धांबवले,” असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक-दोनदा नव्हे तर डझनभर वेळा सांगितले आहे की आम्ही दोन्ही देशांना समजावलं की तुम्ही युद्ध थांबवा अन्यथा आम्ही तुमच्याबरोबरचा व्यापार बंद करू. ट्रम्प यांच्या इशा-यानंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले,” अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.

कॉम्प्युटरवर गेम खेळतात तसा

नाना पटोले पुढे म्हणाले की, “भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ऑपरेशन शिंदूरसंदर्भात एक वक्तव्य केले आहे. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की भारताने आधी पाकिस्तानला सांगितलं होतं की आम्ही अमुक ठिकाणे लक्ष्य करणार आहोत. तुम्ही तुमच्या लोकांना तिथून हटवा, याचा अर्थ असा की लहान मुलं कॉम्प्युटरवर गेम खेळतात तसा गेम खेळवण्यात आला होता,” असा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत शंका असल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नाना पटोले यांनी लष्करी कारवाईवर घेतलेल्या संशयामुळे भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले
यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही? असा सवाल बावनकुळे यांनी विचारला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते @NANA_PATOLE यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि… — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 12, 2025

पुढे बावनकुळे यांनी लिहिले आहे की, “नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि ‘भारत माते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधी  ही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या! नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे.” अशा शब्दांत चंंद्रशेखर बावनकुळे यांनी रोष व्यक्त केला आहे.

 

Web Title: Congress nana patole controversial statement operation sindoor as computer game

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • chandrashekar bawankule
  • Nana patole
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
4

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.