Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे, पण…; विजय घाडगे मारहाणीवरुन काँग्रेस आक्रमक

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर काँग्रेस पक्ष क्रमक झाला आहे. गुंडगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 22, 2025 | 11:37 AM
सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे, पण...; विजय घाडगे मारहाणीवरुन काँग्रेस आक्रमक

सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे, पण...; विजय घाडगे मारहाणीवरुन काँग्रेस आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार व पदाधिकारी गुंड, मवाली बनलेत परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या माजलेल्या लोकांना वेसन घालू शकत नाहीत. कारवाई फक्त विरोधी पक्षांवर करण्याची मर्दुमकी दाखवणाऱ्यांनी निर्ल्लज कृषी मंत्री व गुंडगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची धमक दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

सरकारवर हल्लाबोल करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विधानभवनाच्या इमारतीत झालेल्या हाणामारीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, की आमदार माजलेत पण आमदारच नाही तर मंत्री व पदाधिकारीही माजले आहेत हे त्यांना दिसत नाही का? असा सवाल सपकाळ यांनी केला. कृषीमंत्री कधी शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात तर कधी कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी मुलांची लग्न करतात म्हणून अपमान करतो आणि आतातर हे महाशय चक्क विधानसभेत रमी खेळत बसले होते. या घटनेचा निषेधार्थ करताना छावा संघटनेने लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना निवेदन देत पत्ताच्या सेट दिला, हा निषेध करण्याचा मार्ग आहे, त्यात चुकीचे काय? पण अजित पवारांच्या पाळलेल्या गुंडांनी त्या आंदोलकांना बेदम मारहाण केली, हा माज कशातून येतो? सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे, पण सत्तेची ही नशा जास्त काळ रहात नाही. या प्रकरणाचा आता निषेध केला जात आहे पण असा पोकळ निषेध काय करता? कृषी मंत्र्याला घरी पाठवा आणि या माजलेल्या सडकछाप गुंडांना जेलमध्ये खडी फोडण्यासाठी पाठवा, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात अडकला

राज्यातील काही मंत्री व अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसने विधानसभेत केला पण राज्याचे मुख्यमंत्र्यांनी, असे काहीच घडले नाही अशा राणाभीमदेवी थाटात निवेदन केले. पण सवयीप्रमाणे मुख्यमंत्री धादांत खोटे बोलले. या हनी ट्रॅपचे धागेदोरे भाजपाच्या अत्यंत जवळ पोहचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटच्या मंत्र्याबरोबर हनीट्रॅपशी संबंधित व्यक्तीचा फोटो झळकल्याने या प्रकरणातील गांभिर्य अधिकच गडद झाले आहे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे पण हनी ट्रॅपची उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Congress party demands action from government over assault on vijay ghadge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Latur news
  • suraj chavan

संबंधित बातम्या

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा
1

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी
2

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात
3

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार
4

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.