Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News: बीड कारागृहातील मारहाण प्रकरणावरून सपकाळांची फडणवीसांवर सडकून टीका; म्हणाले, “गृहखात्याचा मोह…”

महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले आहे अशी परिस्थती आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2025 | 07:18 PM
Beed News: बीड कारागृहातील मारहाण प्रकरणावरून सपकाळांची फडणवीसांवर सडकून टीका; म्हणाले, "गृहखात्याचा मोह..."

Beed News: बीड कारागृहातील मारहाण प्रकरणावरून सपकाळांची फडणवीसांवर सडकून टीका; म्हणाले, "गृहखात्याचा मोह..."

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले आहे अशी परिस्थती आहे. बीडच्या रस्त्यावर सुरु असलेले गँगवॉर आता जेलमध्ये पोहोचले आहे. पोलीस आणि गृहविभाग काय करत आहे? असा संतप्त सवाल करून देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

या सदंर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पण सरकारला याचे काही गांभीर्य आहे असे दिसत नाही. राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली, सरकारी आशिर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू, कोळसा माफिया तयार झाले आहेत. ते दररोज पोलिसांना आव्हान देत आहेत. खून, दरोडे बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढूनही आरोपींना अटक होत नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करावे लागते ही राज्याला शरम आणणारी बाब आहे.

भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते. त्यामुळे महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली. पण गेल्या काही दिवसांत सरकारच्या आणि विशेषत: गृहविभागाच्या गलथानपणामुळे महाराष्ट्राच्या नावाला काळिमा लागला असून महाराष्ट्राची तुलना उत्तरेतल्या राज्यातल्या जंगलराजसोबत होऊ लागली आहे.

Walmik karad: बीड कारागृह मारहाणप्रकरणी तुरुंग प्रशासनाचा मोठा निर्णय; महादेव गित्ते अन् चार आरोपींना थेट…

सत्ताधारी पक्षाचे आमदारच बीडचा बिहार, तालिबान झाला आहे असे सांगत आहेत. बीडमध्ये आका, खोक्या सत्ताधा-यांच्या आशिर्वादानेच उदयास आले आहेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची मजाल इतकी वाढली आहे की आता बीडच्या जेलमध्येच कराड आणि गित्ते या दोन टोळ्यांमध्ये गँगवार सुरु झाले आहे. त्यामुळेच बीड कारागृहातून महादेव गित्तेसह काही आरोपींना छत्रपती संभाजी नगरच्या हर्सूल कारागृहात हलवल्याचे वृत्त येत आहे. आता बीडचे जेलही सुरक्षित नाही. ही चिंतेची बाब आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

बीड कारागृह मारहाणप्रकरणी तुरुंग प्रशासनाचा मोठा निर्णय

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये आणि खंडणीच्या आरोपाखाली असलेल्या वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता बीड जिल्हा कारागृहात बबन गित्ते समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैद्यांमध्ये मारामारी झाली. दरम्यान या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. वाल्मीक कराड आणि सुदर्श घुलेला मरण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यांना बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्तेने मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. मात्र तुरुंग प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यांनंतर महादेव गित्ते आणि चार आरोपींची रवानगी बीड कारागृहातून दुसरीकडे करण्यात आली आहे.

Web Title: Congress president harshwardhan sapkal criticizes to devendra fadnavis beed jail crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • Beed crime News
  • CM Devendra Fadanvis
  • Harshwardhan Sapkal
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
1

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना
3

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
4

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.