पुणे : सध्या कोकणासह सर्वदूर पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच एक घटना पुणे-मुंबई मार्गावर उघडकीस आली आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
[read_also content=”https://www.navarashtra.com/india/boat-sinks-in-yamuna-in-uttar-pradesh-three-dead17-missing-nrps-315058.html उत्तरप्रदेशमध्ये यमुनेत बोट बुडून तिघांचा मृत्यू , 17 जण बेपत्ता”]
पुणे-मुंबई लोहमार्गावर ही घटना मध्यरात्री घडलेली असून अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अप लाईनवर ही दरड कोसळल्याने इथून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. परिणामी अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र, अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. पुणे मुंबई रेल्वे वाहतूक नऊ वाजता पूर्वपदावर येईल.
[read_also content=”https://www.navarashtra.com/sports/a-big-change-in-the-cricket-team-for-indias-tour-of-zimbabwe-315051.html भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातील क्रिकेट संघात मोठा बदल”]