राज्यसभा (Rajyasabha Election) निवडणुकीत भाजप(BJP)च्या तीनही जागा निवडून आणण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी यशस्वी झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडी(MVA)ची ९ ते १० मते मिळवण्यात यश आले आहे. भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मते मिळाल्यानं धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला. यावेळी, त्यांनी विजयाचे श्रेय आपल्या दोन आमदारांना दिले आहे.
शिवसेनेचे दुसरे आणि महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपकडे सहाव्या जागेसाठी कमी मते असताना विजय मिळवत आघाडीला जोरदार दणका दिला. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी, आमचे तिन्ही उमेदवार विजयी झाले असून हा विजय आम्ही लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना अर्पण करतो, असे सांगितले.