Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोट्यवधी रुपये गेले पाण्यात; काँग्रेस प्रवक्त्याचा आरोप

ठाण्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानांतर्गत ठाणे शहराचा (Fund to Thane City) संपूर्ण कायापालट करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून 130 कोटी रुपयांचा निधी ठाणे शहरास देण्यात आला. त्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2023 | 02:11 PM
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोट्यवधी रुपये गेले पाण्यात; काँग्रेस प्रवक्त्याचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : ठाण्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानांतर्गत ठाणे शहराचा (Fund to Thane City) संपूर्ण कायापालट करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून 130 कोटी रुपयांचा निधी ठाणे शहरास देण्यात आला. त्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. शहर सुशोभीकरणाअंतर्गत संरक्षक भिंती आणि दर्शनी भागातील रंगकामासाठी आत्तापर्यंत 34.64 कोटी रुपयांचे काम झालेले असून, त्याचे देयक अदा करण्यात आलेले आहेत.

रंगकाम करताना निकृष्ट दर्जाचे रंगकाम साहित्य वापरल्याने पावसाच्या पाण्याने रंग, डिस्टेंपर वाहून जात अवघ्या काही महिन्यांपूर्वी काढलेले रंग चित्र खराब होत असल्याने जनतेचे कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाण्यात जात आहेत. परंतु, अधिकाऱ्यांना याचे कुठलेही गांभीर्य नाही.

चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या रंगकामाबाबत, पावसाच्या पाण्यात वाहून जात खराब होत असलेले रंगचित्रे व रंगकामाबाबत या प्रकल्पावरील कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना पत्राद्वारे, फोनद्वारे, व्हॉट्सअॅपद्वारे, प्रत्यक्षदर्शी छायाचित्रांसह तक्रारी दाखल करत विचारणा केली असता ‘एखाद टक्का असेल की…’ अशी उत्तरे अधिकारी देतात. याबरोबरच रंगकामाबाबत माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना देखील चुकीची व दिशाभूल करणारी उत्तरे मिळत आहेत.

त्यामुळे आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घेत शासनाने दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करत निकृष्ट दर्जाची रंगचित्रे रंगकामाची चौकशी करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे. याची पर्यवेक्षणीय जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे चुकीचे काम होऊनही दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी याबाबत सातत्याने पाठपुरावा करणारे ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Crores of rupees went down in water at the cm area allegation of congress spokesperson nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2023 | 02:11 PM

Topics:  

  • Development Work
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
1

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर
2

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव
3

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा
4

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.