Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजगुरुनगर नगरपरिषदेचा विकासाकडे कल; करवाढीशिवाय 122.80 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

विकासाचा वेग कायम ठेवत नागरिकांवर कोणताही करभार न टाकता राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल १२२ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 28, 2026 | 06:00 PM
राजगुरुनगर नगरपरिषदेचा विकासाकडे कल; करवाढीशिवाय 122.80 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

राजगुरुनगर नगरपरिषदेचा विकासाकडे कल; करवाढीशिवाय 122.80 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

Follow Us
Follow Us:

राजगुरुनगर : विकासाचा वेग कायम ठेवत नागरिकांवर कोणताही करभार न टाकता राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल १२२ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. बुधवार (दि. २५) रोजी नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाने तयार केलेला हा अर्थसंकल्प उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर यांनी सभागृहात मांडला. “विकासाला चालना आणि नागरिकांना दिलासा” हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.

 

अर्थसंकल्प दृष्टिक्षेपात

महसुली जमा : २१.५१ कोटी

भांडवली जमा : १०१.२८ कोटी

एकूण अपेक्षित जमा : १२२.८० कोटी

महसुली खर्च : २९.४८ कोटी

भांडवली खर्च : १०९.४० कोटी

अखेरची शिल्लक : २६ लाख

अपेक्षित उत्पन्नाचे प्रमुख स्रोत

संकलित कर : ७.३८ कोटी

पाणीपट्टी : २.५० कोटी

बांधकाम विकास शुल्क : २.५० कोटी

नगरपालिका सहाय्यक अनुदान : २.५० कोटी

नगरपरिषदेकडून स्थानिक उत्पन्नवाढीवर भर देत आर्थिक शिस्तीचे पालन करण्यात आले आहे.

विकासकामांवर विशेष भर

भीमा नदी स्वच्छता व संवर्धन : ५ कोटी

पाणीपुरवठा योजना व विस्तारीकरण : १.५० कोटी

जलसंधारण उपक्रमांना प्राधान्य

शहरातील जलस्रोतांचे जतन आणि स्वच्छतेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

रस्ते बांधकाम व डांबरीकरण : ५ कोटी

अधिसूचित नागरी सेवा व सुविधा : १० कोटी

दिवे व विद्युत खांब उभारणी : ५० लाख

सांडपाणी व गटार व्यवस्थापन सुधारणा

मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे शहरातील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.

कचरा संकलन व प्रक्रिया : १.२० कोटी

पाणीपट्टी व वीजबिल : १.५० कोटी

हे सुद्धा वाचा : इंदापूर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर; ‘या’ कामांसाठी विशेष तरतूद

सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकासाचा संदेश

महिला व बालकल्याण, दुर्बल घटक तसेच दिव्यांग नागरिकांसाठी प्रत्येकी ५ टक्के स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतो. या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. आर्थिक समतोल राखत विकासाची गती कायम ठेवण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे. राजगुरुनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी वर्षात शहराचे रूप अधिक सुशोभित आणि सुविधायुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: The budget of rajgurunagar municipal council has been unanimously approved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Budget
  • maharashtra
  • Rajgurunagar

संबंधित बातम्या

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
1

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
2

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.