Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SATTE 2026 : जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग असून ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि दिल्ली रोड शोचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 28, 2026 | 04:03 PM
जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : दक्षिण आशियातील अग्रगण्य बी२बी प्रवास व पर्यटन प्रदर्शन SATTE 2026 (South Asia’s Travel & Tourism Exchange) च्या ३२व्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने सहभाग घेऊन विशेष दालन उभारण्यात आले. नवी दिल्ली येथील यशोभूमी, इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर, द्वारका येथे २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या दालनाने देश-विदेशांतील पर्यटक व व्यावसायिकांचे लक्ष वेधून घेतले.

या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या दालनाचे उद्घाटन पर्यटन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांद्वारे करण्यात आले. इनफॉर्मा मार्केट्सद्वारे आयोजित प्रदर्शनामध्ये ५० हून अधिक देश व २८ राज्यांतील पर्यटन मंडळांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाचे नेतृत्व संतोष जाधव, सहसंचालक, पर्यटन संचालनालय, चंद्रशेखर जयस्वाल, महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, विजय जाधव, उपसंचालक पर्यटन संचालनालय यांनी केले. पर्यटन विभागाच्या दालनामध्ये हॉटेल व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. तसेच त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यावसायिकांशी बी२बी बैठकांद्वारे संवाद साधला.

Chandrapur: चंद्रपूर-यवतमाळ सीमेवरील पैनगंगा नदीच्या घाटावर अद्याप पूल नाही; ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या दालनामध्ये एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक गड-किल्ले, कोकण किनारपट्टीचे सौंदर्य, वन्यजीव पर्यटन, तीर्थक्षेत्रे, शहरी पर्यटन, माईसचे वाढते क्षेत्र याची नव्याने ओळख करुन देण्यात आली.

या प्रदर्शनाबाबत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, “SATTE आणि दिल्ली रोडशोमधील महाराष्ट्राचा सहभाग हा राज्याला जागतिक पर्यटनामध्ये यशस्वीरित्या अधोरेखित करण्यास मदत करत आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंतच्या पर्यटन स्थळांद्वारे आम्ही पर्यटकांना आमंत्रित करत आहोत. त्याचबरोबरीने एक आधुनिक आणि शाश्वत पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर महाराष्ट्राला प्रभावीपणे अधोरेखित करण्याचा आमचा मानस आहे. सदर प्रदर्शनाद्वारे गुंतवणूकदार आणि पर्यटन भागधारकांसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. यातूनच जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र निर्माण होईल असा आम्हाला विश्वास आहे”.

तसेच संतोष जाधव, सहसंचालक, पर्यटन संचालनालय यांनी सांगितले की, “राज्याच्या पर्यटन धोरणाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी SATTE हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या प्रदर्शनाद्वारे आम्ही राज्यातील पर्यटन संधी, धोरणातील गुंतवणूकीपर प्रोत्साहने नव्याने जगासमोर आणत आहोत. जगभरातील पर्यटकांना राज्यातील पर्यटनाकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”.

या प्रदर्शनाची सुरुवात महाराष्ट्र राज्याच्या परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर एका विशेष सादरीकरणाद्वारे राज्यातील ऐतिहासिक वारसा, वन्यजीव, विस्तीर्ण समुद्रकिनारे, आध्यात्मिक केंद्रे आणि अनुभवात्मक पर्यटनाची माहिती देण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख निर्माण करुन देण्यासाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटन प्रतिनिधी आणि दिल्लीतील व्यावसायिक यांच्यात बी२बी (B2B) चर्चा झाली. यामुळे भविष्यातील पर्यटन व्यवसाय संधींसाठी अधिक प्रेरणा व बळकटी मिळाली आहे. कार्यक्रमाचा समारोप होत असताना उद्योग क्षेत्रातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मान्यवरांमध्ये चर्चा झाली. या प्रदर्शनाद्वारे पर्यटन नकाशावर महाराष्ट्र राज्य नव्याने अधोरेखित झाले आहे. विशेषतः यंदा ऐतिहासिक वारसा, शाश्वत पर्यटन, माईस व किनारी पर्यटनावर विशेष भर देण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग 31 मे 2006 रोजी स्थापन करण्यात आला असून, राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व पर्यटन क्षेत्राची वृद्धी हा विभागाचा मुख्य उद्देश आहे. सांस्कृतिक जतन व पर्यटन विकास यांचा समन्वय साधून राज्याच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीस चालना देणे, तसेच नागरिक व पर्यटकांना समृद्ध अनुभव प्रदान करणे यासाठी विभाग कार्यरत आहे.

‘लाडक्या बहिणी’मुळे अन्य खात्यांवर येतोय आर्थिक ताण; आता योजना बंद होणार का? मंत्री नाईक म्हणाले…

Web Title: Maharashtra tourism participation global satte 2026 pavilion response news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • tourism

संबंधित बातम्या

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
1

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत
2

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

घरचे तज्ज्ञ असताना सल्लागार कशाला? पुणे महापालिकेत 30 हून अधिक सल्लागारांवर 32 कोटींहून अधिक खर्च
3

घरचे तज्ज्ञ असताना सल्लागार कशाला? पुणे महापालिकेत 30 हून अधिक सल्लागारांवर 32 कोटींहून अधिक खर्च

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण
4

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.