Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन

Dahi Handi : दहीहंडी उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड देत ‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पना बळकट करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वरळी, दादर आणि घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवांना भेट देत त्यांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला आणि उत्सवातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे आवाहन केले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 05, 2026 | 07:15 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दहीहंडी हा महाराष्ट्राच्या परंपरेचा, साहसाचा आणि संघभावनेचा जागर
  • वरळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ
Dahi Handi : युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. उत्साहाने भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मुंबईतील वरळी येथील राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी’ उत्सव प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, आमदार अमित साटम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

निरोगी आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, तसेच आपल्या कुटुंबात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

लहान मुलांच्या पाठीवरील ‘ओझे’ अखेर उतरणार! राज्य सरकारचा शाळांना कडक इशारा; नियम मोडल्यास कारवाई?

दहीहंडी हा महाराष्ट्राच्या परंपरेचा, साहसाचा आणि संघभावनेचा जागर

दहीहंडी हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राच्या परंपरेचा, तरुणाईच्या साहसाचा आणि संघभावनेचा जागर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकात आमदार राम कदम यांच्या वतीने आयोजित मानाच्या दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. गोविंदा पथकांतील तरुणांचा उत्साह, जिद्द आणि शिस्त पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, दहीहंडीतील मानवी मनोरे हे संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. तळातील गोविंदांच्या मजबूत आधारापासून ते सर्वांत वरच्या थरावर पोहोचणाऱ्या बालगोविंदापर्यंत प्रत्येकाचा समन्वय, विश्वास आणि धैर्य या खेळाला यशस्वी करतात. घाटकोपरची दहीहंडी ही मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनली असून, येथे देशाच्या विविध भागांतून येणारी पथके सहभागी होतात. त्यामुळे हा उत्सव आता केवळ स्थानिक स्वरूपाचा न राहता व्यापक ओळख निर्माण करणारा सांस्कृतिक सोहळा झाला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी

वरळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ

आज सकाळपासूनच गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष आणि उंचच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी’ उत्सवात प्रतिकात्मक दहीहंडी फोडून शुभारंभ केला. दहीहंडीतून निघालेले ‘नशामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेचा संदेश देणारे बॅनर यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी प्रदर्शित केले.

यानंतर वरळी येथे जांबोरी मैदानावरील परिवर्तन फौंडेशन आयोजित दहीहंडी’ उत्सव प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. दहीहंडी उत्सवातून युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. दहीहंडीच्या थरारात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

गोविंदा पथकांनी उंच थर रचताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी आयोजकांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह लोकप्रतिनिधी, गोविंदा पथके व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: Dahi handi dahi handi festival linked to a drug free maharashtra fadnavis appeals to govinda troupes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Dahi Handi
  • Dahi Handi 2026
  • devendra fadamvis

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
1

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
3

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती
4

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.