
मुंबई : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव चर्चेत आलं आहे. नृत्यांगना असलेल्या गौतमी पाटीलच्या (Gautami Patil Dance) प्रत्येक कार्यक्रमाला उसळणारी प्रचंड गर्दी आणि तिच्या दिलखेचक अदा, यामुळं ग्रामी महाराष्ट्रात गौतमी प्रचंड प्रसिद्धीला आली आहे. गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम म्हणजे गर्दीची खात्री असल्यानं अनेक ठिकाणी तिला कार्यक्रमांसाठी बोलवलंही जाऊ लागलंय. मात्र, प्रत्येक कार्यक्रमात होत असलेल्या हुल्लडबाजीनं गौतमीचे कार्यक्रम सातत्यानं वादातही राहिलेत. सातत्यानं होत असलेल्या या नकारात्मक प्रसिद्धीनं गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ केल्याचं दिसतंय.
https://twitter.com/GautmiPatil/status/1659428268658012160
नाशिकनंतर आता बार्शीतही वादावादी
नाशिकच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातही हुल्ललडबाजी झाली. इतकंच नाही तर काही पत्रकारांनाही मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं. याच कार्यक्रमात गौतमी पाटीलची लोकप्रियता ओसरतेय की काय अशी शंका निर्माण झालीय. नाशिकच्या कार्यक्रमात अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या, असं समोर आलंय. यानंतर बार्शीतल्या तिच्या कार्यक्रमातही वाद झालाय. गौतमी पाटील या कार्यक्रमाला उशिरा पोहचल्यानं तिची आणि आयोजकांची वादावादी झाल्याचं सांगण्यात येतंय. यावर आयोजकांनी उशिरा बोलावलं म्हणूनच उशीर झाल्याचा दावा गौतमीनं केला आहे.
‘मी काय महाराष्ट्राचा बिहार करतेय का?’ : गौतमी
सातत्यानं होत असलेले वाद, कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, सातत्यानं होत असलेला नकारात्मक प्रचार यामुळं गौतौमी पाटील संतापली आहे. सांगोला तालुक्यात कार्यक्रमाला आलेल्या गौतमीनं हा उद्वेग व्यक्त केला आहे. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का, इतर महिला दिसत नाहीत का, असा सावलच तिनं टिकाकारांना केलाय. आधी आपला कार्यक्रम पाहा आणि मग टीका करा, असा सल्लाही तिनं दिलाय. मी काय महाराष्ट्राचा बिहार केला आहे का, दादा, असा सवालही तिनं सगळ्यांनाच केलाय. ट्विटरवरही तिनं मी करते ते योग्य आहे, असं सांगत टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.
वाद नको, कार्यक्रम एन्जॉय करा
महगाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं गौतमीनं म्हटलय. हुल्लडबाजी, पत्रकारांना मारहाण हे अयोग्यच असल्याचंही तिनं सांगितलंय. कार्यक्रमात या, एन्जॉयकरा, वाद आणि हाणामाऱ्या करु नका, असं आवाहनही तिनं चाहत्यांना केलंय.
बार्शीत नेमकं काय घडलंय?
बार्शीत आयोजकांनी तिकिट लावून गोतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. आयोजकांनी सांगितलं त्याच वेळी स्टेजवर गेले, यात आपली चूक काय, असा सवाल तिनं केलाय. कार्यक्रमाची परावनगी एकतर आयोजकांनी घेतली नव्हती. रात्री १० नंतर पोलिसांनी कार्यक्रम थांबवला. असंही तिनं स्पष्ट केलं. या सगळ्यात आय़ोजक आणि गौतमी पाटील यांच्यात वाद रंगलाय.. बार्शीतील कार्यक्रमात फसवणबक झाल्याचा आरोप करत गोतमी पाटीलसह तिच्या सहकाऱ्यावर आयोजकांनी गुन्हा दाखल केलाय. तर कार्यक्रमासाठी ठरलेली रक्कम आयोजकांनी दिलीच नाही, असं गौतमीच्या वतीनं सांगण्यात आलंय. आयोजकच उशिरा आल्यानं कार्यक्रमाला उशीर झाल्याचा दावाही करण्यात आलाय. पैशांवरुन हा वाद रंगलाय का, असा प्रश्न आता निर्माण होतोय.