Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Daund Politics: दौंडच्या १७ नगरसेवकांनी गेम फिरवला!पुणे आमदारकीच्या समीकरणात मोठा बदल

Daund Councillors: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये वाढलेल्या भाजपच्या प्रभावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही जागा खेचून आणण्यासाठी आक्रमक रणनीती आखत असल्याचे बोलले जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 20, 2026 | 04:46 PM
Daund Councillors, Pune Politics, BJP Boost, NCP vs BJP,

Daund Councillors, Pune Politics, BJP Boost, NCP vs BJP,

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा
  • गेल्या दोन कार्यकाळांपासून या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले आमदार होते
    • नागरी हित संरक्षण मंडळाच्या १७ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा
Pune MLC Election : पुणे जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून, महायुतीतील घटक पक्षांमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून, १८ जून रोजी मतदान होणार आहे.

पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने या जागेवर त्यांचा नैसर्गिक दावा मानला जात आहे. गेल्या दोन कार्यकाळांपासून या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले आमदार होते. त्यामुळे पुन्हा ही जागा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Warli Art Design : पुणे SNDT च्या विद्यार्थीनीची कमाल! सई राऊतच्या वारली पेंटिगला भारत सरकारकडून पेटंट

जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील एकूण मतदारांची संख्या सुमारे ८०४ आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४७ सदस्य आहेत, तर भाजपचे ३१९ सदस्य आहेत. शिवसेनेचे ६८, काँग्रेसचे १९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १७ सदस्य आहेत.

मात्र, दौंड (Daund Politics) नगरपालिकेतील प्रेमसुख कटारिया यांच्या नागरी हित संरक्षण मंडळाच्या १७ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने निवडणुकीचे गणित अचानक बदलले आहे. या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ ३३६ पर्यंत पोहोचले असून, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील अंतर आता केवळ ११ मतांचे राहिले आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये वाढलेल्या भाजपच्या प्रभावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही जागा खेचून आणण्यासाठी आक्रमक रणनीती आखत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीही ही जागा प्रतिष्ठेची मानून पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.

Pune Gang War: पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटलं! बालाजीनगरात गोळीबार करून अक्षय म्हस्केची हत्या

दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली, तर मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः शिवसेनेचे ६८ सदस्य कोणाच्या बाजूने मतदान करणार आणि शरद पवार गटाचे सदस्य कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उमेदवारीसाठी दोन्ही पक्षांत मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमे थोरात, आणि विलास लांडे हे माजी आमदार इच्छुक आहेत. याशिवाय अजित गव्हाणे, रणजित शिवतारे आणि दीपक मानकर यांचीही नावे चर्चेत आहेत. काही सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून एखादे अनपेक्षित नाव पुढे आणले जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून संग्राम थोपटे, संजय जगताप, गणेश बिडकर हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुणे विधान परिषद निवडणूक ही महायुतीतील अंतर्गत शक्तिपरीक्षा ठरणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

 

Web Title: Daund politics daunds 17 councillors shift equation boost bjp in pune legislative race

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Pune Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.