Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar On Dhananjay Munde : बीड प्रकरणात कारवाई होणार; धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचं मोठं विधान

सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षनेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. त्यावर आज अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 09, 2025 | 04:59 PM
बीड प्रकरणात कारवाई होणार; धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचं मोठं विधान

बीड प्रकरणात कारवाई होणार; धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि वाल्मिक कराडवरील खंडणीच्या आरोपांवरून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची टांकती तलवार आहे. बीडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवरून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षनेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. त्यावर आज अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.

वाल्मिक कराड प्रकरणात ED ची कारवाई का नाही? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल, निर्मला सीतारमण यांच्याकडे करणार तक्रार

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का? याबद्दल माध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केलं आहे. या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी सुरु आहे. तीन एजन्सी चौकशी करत आहेत. जो कोणी दोषी असेल. ते सिद्ध झालं तर कारवाई निश्चित होणार आहे. चौकशी सुरु आहे. आरोपी सापडायला वेळ लागला. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे, असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला.

कोणत्याही चौकशीमध्ये उद्या कदाचित तुमच्यावरही आरोप होतील. त्यामुळे आता एसआटी, सीआयडी, न्यायाधीशांची चौकशी सुरु आहे. त्याच्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. .या प्रकरणता जो कोणी दोषी असेल तो तिथं सिद्ध झालं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात मी देखील देवेंद्र फडणवीसांना भेटून सांगितलं आहे.

या संदर्भात पक्ष न बघता वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असतील तर कुणाचीही गय करणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले मीही त्याच मताचा आहे. प्रत्येकाची चौकशी करून कुणाकुणाला फोन झाले, किती वेळ बोलणं झालं, हे सगळं समोर येणार आहे. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. सरकारने यात गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे. कुणाला काय बोलायचं याचा अधिकार संविधानाने दिला आहे. असं करताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल.

Delhi Election 2025 : दिल्लीत केजरीवाल जिंकतील…; कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांना वक्तव्य करणं भोवलं, दिलं स्पष्टीकरण

माझी कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यांना (सुरेश धस) मी सांगितलं आहे, नुसते आरोप करण्यापेक्षा तपास यंत्रणेला पुरावे द्या. त्याबद्दल माझी आणि बावनकुळेंशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे बीड प्रकरणाचा बारकाईने तपास सुरु आहे. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच आम्हाला काळजी आहे. आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे आमची जबाबदारी जास्त आहे. याच्यात आम्ही कुणालाही पाठिशी घालणार नाही.

वाल्मिक कराडशीसंबंध असल्याच्या कारणावरून धनंजय मुंडे काही दिवसांपासून निशाण्यावर आले आहेत. या दरम्यान याच वातावरणात त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे ते राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आज अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली.

Web Title: Dcm ajitv pawar reaction on beed crime santosh deshmukh case and dhananjay munde relation with walmik karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 04:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी
2

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
3

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला
4

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.