Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Update: मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान; DCM एकनाथ शिंदेंनी थेट…

कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2025 | 08:33 PM
Maharashtra Rain: मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान; DCM एकनाथ शिंदेंनी थेट...

Maharashtra Rain: मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान; DCM एकनाथ शिंदेंनी थेट...

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात पावसाचा जोर कायम 
विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस 
नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले 

ठाणे: मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून असून, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव व संचालकांशी बोलून त्यांना सूचनाही दिल्या.

मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून  संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

दरमान धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजले. उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ एनडीआरएफच्या मदतीने हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेण्याचे निर्देश दिले. तसेच कोणतीही मदत लागल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा आणि वेळोवेळी पूर परिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी असेही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

राज्यात पाऊस थैमान घालणार

बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर घोंघावतेय मोठं संकट! राज्यात पाऊस थैमान घालणार; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Web Title: Dcm eknath shinde get report of the heavy rainfall in marathwada weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Heavy Rain
  • Marathwada Rain

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्याच्या दिशेने येतेय मोठे संकट; IMD ने दिला ‘हा’ इशारा
1

Maharashtra Rain Alert: राज्याच्या दिशेने येतेय मोठे संकट; IMD ने दिला ‘हा’ इशारा

Narayan Rane : …तर आम्ही संबंध तोडू; नारायण राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा
2

Narayan Rane : …तर आम्ही संबंध तोडू; नारायण राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा

उपमुख्यमंत्री शिंदेंनी अण्णा हजारेंच्या थेट गावी जाऊन घेतली भेट; ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं
3

उपमुख्यमंत्री शिंदेंनी अण्णा हजारेंच्या थेट गावी जाऊन घेतली भेट; ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं

Pune Leopard News: “बिबट्याच्या विषयात मी स्वतः…”; काय म्हणाले DCM एकनाथ शिंदे?
4

Pune Leopard News: “बिबट्याच्या विषयात मी स्वतः…”; काय म्हणाले DCM एकनाथ शिंदे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.