dcm eknath shinde jay Gujarat Announcement in pune Gujarat bhavan
Eknath Shinde Jay Gujarat : पुणे : पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी गुजरात भवन येथे कार्यक्रमामध्ये अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना भाषण दिले. भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली आहे. यामुळे आता राज्यामध्ये वाद पेटणार आहे.
भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणामध्ये म्हणाले की, “आजचा दिवस संपूर्ण गुजरात समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. याठिकाणी मी भगत येत होतो. येथे काहीही कमी नाही. तुम्ही सगळे लक्ष्मीपुत्र आहात. पैसे कमी पडण्याची गोष्टच नाही. त्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण झाले. ज्या कामांचे भूमिपूजन हे पंतप्रधान मोदी करतात ते काम लवकर पूर्ण होते, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. आमच्यासाठी मोदीजी आणि अमित भाई वेगळे नाही. मोदींची सावली हे अमित शाह आहेत. अमित शाह यांचा स्पर्श झाल्यानंतर त्या कार्याचे सोने होते,” अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
पुढे ते म्हणाले की, “मला आनंद दिघे यांनी सांगितलेली गोष्ट आठवत आहे. कोणतेही शहरं असो, कोणते मोठे गृहसंकुल असो किंवा कोणतेही नवे शहर तयार होवो. पण जो पर्यंत तिथे बाजारपेठ तयार होत नाही तो पर्यंत त्या शहराची शोभा वाढत नाही. आणि ही बाजारपेठ बसवणारे तुम्ही व्यावसायिक लोक आहात. त्यामुळे तुमच्या शिवाय कोणत्याही शहराची शोभा वाढत नाही,” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बंडखोरीच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, 2022 तुम्हाला माहिती आहे. राज्यामध्ये दुकानं, घरं, मंदिरं, सण आणि पूर्ण शहरे बंद होती. यावेळी लोक स्पीड ब्रेकर आणत होती. या वेळी मी गर्वाने सांगतो की आमच्यासोबत नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन तर होते पण माझ्या पाठीशी अमित शाह यांचा भक्कम पाठिंबा होता. नाही तर हे काम करणे सोप्पे होते का? पण जेव्हा राज्याच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे मी अमित भाई यांचे खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मला पाठिंबा दिला. आता महायुती एक टीम म्हणून विकास करत आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा बंडखोरीच्या आठवणी सांगितल्या.
जय महाराष्ट्र…जय गुजरात
एकनाथ शिंदे भाषणाच्या शेवटी म्हणाले की, “अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असले तरी त्यांच्या होम मिनिस्टर या कोल्हापूरच्या आहेत. ते आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांच्या घरात मराठी आणि गुजराती दोन्ही भाषा आनंदाने नांदतात. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातने दोन्ही राज्यांनी विकास, संस्कृती आणि उद्योग या क्षेत्रामध्ये नेहमीच देशाला दिशा दाखवली आहे. आपली ही एकजूट अशीच मजबूत ठेवा. या राज्याच्या विकासामध्ये आपलं देखील योगदान आहे. कारण शेवटी उद्योजक आणि व्यापारी लोक हे या राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपलं योगदान आम्ही लक्षात ठेवतो. सरकारकडून उद्योगामध्ये कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास मी देतो. जय हिंद..जय महाराष्ट्र…जय गुजरात, “अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी दिली.