राजकीय विरहाची २० वर्षे अन् ठाकरे बंधू; मनोमिलन होणार की मराठीचा 'विजय' मोर्चापर्यंत सीमित राहणार?
फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर सर्वत्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मोर्चाची चर्चा सुरू आहे. या निमित्त दोन्ही नेते एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दोन्ही पक्षांचे काही नेते आणि कार्यकर्त्यांनी भावनिक साद घातली आहे. त्यातच मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले की मी मरायला मोकळा, असे भावनिक उद्गार काढले आहेत.
Eknath Shinde Jay Gujarat : “जय गुजरात…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात घोषणा, वाद पेटणार
शुक्रवारी दादरमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं. माध्यमांशी बोलताना ते भावुक झाले आणि म्हणाले, “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना मी पाहिलं आणि उद्या मरण आलं तरी खंत नाही. वर गेलो तर बाळासाहेबांना सांगेन की तुमची दोन्ही लेकरं पुन्हा एकत्र आली आहेत.”
महाजन पुढे म्हणाले, “आजचा क्षण बाळासाहेबांनी स्वतः पाहावा असं मला वाटतं. मी त्यांच्या समाधीपाशी म्हणूनच आलो होतो. मी त्यांना हे सांगू शकत नाही, पण उद्या जर मृत्यू आला तर हे ऐतिहासिक दृश्य मी त्यांच्या चरणी अर्पण करीन. दोन्ही बंधू मराठी माणूस, मराठी भाषा, शेतकरी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आले आहेत. हा आनंद मी डोळ्यांनी पाहिला, आता बाळासाहेबांनी चिंता करू नये.” असं स्वर्गात जाऊन सांगेन.
महाजनांनी यापूर्वीच पक्षशिस्त बाजूला ठेवत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. “मी दोघांबरोबर दौरे केले आहेत. राज ठाकरे आक्रमक आहेत, तर उद्धव ठाकरे शांत आणि संयमी. शरद पवार यांचेही आभार मानतो, ज्यांनी सांगितलं – राज ठाकरेंच्या सभेला गर्दी असते, आणि उद्धव ठाकरेंच्या सभेतील गर्दी मतदानात परावर्तित होते. आता ही गर्दी आणि मतदान दोन्ही एकत्र येणार आहे, हा खऱ्या अर्थाने उत्साहाचा क्षण आहे,” असं महाजन म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी माझे दोन्ही भाऊ गमावले, त्यामुळे भाऊ म्हणजे काय याची मला जाणीव आहे. उद्या हे ठाकरे बंधू एकमेकांचा आधार बनतील. मराठी जनतेसाठी ते कायम एकत्र राहतील, अशी माझी खात्री आहे. महाराष्ट्राच्या तरुणांना दिशा देणारा नेता आज पुन्हा एकदा उभा राहतो आहे. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होणार आहे.”
महाजनांनी युतीच्या विरोधकांवर निशाणा साधत म्हटलं, “हे दोन सिंह एकत्र येऊ नयेत म्हणून काही कोल्हेकुई करत आहेत. त्यांना त्यांच्या मालकाला खूश करायचं आहे. पण आता जरी ब्रह्मदेव स्वतः खाली उतरला, तरी ही युती तोडू शकणार नाही. हे दोन्ही भाऊ मराठी माणसांच्या हक्काचे नेते बनणार आहेत”, असं दावा त्यांनी केला आहे.