Big Breaking: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने श्रीनगरला रवाना; अडकलेल्या पर्यटकांना परत आणणार
मुंबई: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यामध्ये ६ महाराष्ट्राच्या नागरिकांचा समावेश आहे. आता अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या नागरिकांचा देखील समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. तिथे अडकून पडलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे रवाना झाले आहेत.
एकनाथ शिंदे रात्री ८ पर्यंत श्रीनगरला पोचणार असल्याचे समजते आहे. तिथे जाऊन महाराष्ट्रातील अडकेलेल्या पर्यटकांना परत आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे पार पाडणार आहेत. पहलगाम येथे अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.
काश्मीरमध्ये अडकेलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. पर्यटकांना परत आणण्याचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. एकनाथ शिंदे हे सातत्याने पर्यटकांच्या संपर्कात आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. श्रीनगरला पोहोचल्यावर एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेणार आहेत. त्यांना मुंबईत सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर अमित शाह आक्रमक
पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. हल्ल्याची माहिती कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरला रवाना झाले. आज त्यांनी पहलगाममध्ये पाहणी केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना सज्जड इशारा दिला आहे.
काल पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी काही महत्वाच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पहलगाममध्ये हल्ला झालेल्या घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पीडित कुटुंबाची, जखमी लोकांची त्यांनी भेट घेतली. यावेळेस त्यांनी या भ्याड हल्ल्यावरून दहशतवाद्यांना गर्भित इशारा दिला आहे.
सबका हिसाब होगा! पहलगाम हल्ल्यानंतर अमित शाह आक्रमक; म्हणाले, “देशाला आश्वासन देतो की…”
अमित शहांचे ट्वीट काय?
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यात आपल्या लोकांना गमावण्याचे दु:ख आहे. हे दु:ख शब्दात व्यक्त करता येणार नाही. मी या सर्व कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला आश्वासन देतो की निष्पाप लोकांना मारणाऱ्या या दहशतवाद्यांना अजिबात सोडले जाणार नाही.
किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना?
काल पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. टीआरएफ (द रेजिडेंट फ्रंट) ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे मानले जाते. दरम्यान या दहशतवादी संघटनेबद्दल जाणून घेऊयात.