अमित शाहांचा दहशतवाद्यांना सज्जड इशारा
श्रीनगर: पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. हल्ल्याची माहिती कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरला रवाना झाले. आज त्यांनी पहलगाममध्ये पाहणी केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना सज्जड इशारा दिला आहे.
काल पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी काही महत्वाच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पहलगाममध्ये हल्ला झालेल्या घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पीडित कुटुंबाची, जखमी लोकांची त्यांनी भेट घेतली. यावेळेस त्यांनी या भ्याड हल्ल्यावरून दहशतवाद्यांना गर्भित इशारा दिला आहे.
अमित शहांचे ट्वीट काय?
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यात आपल्या लोकांना गमावण्याचे दु:ख आहे. हे दु:ख शब्दात व्यक्त करता येणार नाही. मी या सर्व कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला आश्वासन देतो की निष्पाप लोकांना मारणाऱ्या या दहशतवाद्यांना अजिबात सोडले जाणार नाही.
पहलगाम के आतंकी हमले में अपनों को खोने का दर्द हर भारतीय को है। इस दुःख को शब्दों में व्यक्त नहीं किया जा सकता।
मैं अपने इन सभी परिवारों और पूरे देश को विश्वास दिलाता हूँ कि बेगुनाह मासूम लोगों को मारने वाले इन आतंकियों को बिल्कुल बख्शा नहीं जाएगा। pic.twitter.com/Dwkt6Hhj7P
— Amit Shah (@AmitShah) April 23, 2025
किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना?
काल पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. टीआरएफ (द रेजिडेंट फ्रंट) ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे मानले जाते. दरम्यान या दहशतवादी संघटनेबद्दल जाणून घेऊयात.
इंडियन मुजाउद्दीन आणि लष्कर ए तोयबा यांच्यामधून टीआरएफ दहशतवादी संघटना तयार करण्यात आली आहे. या संघटनेचे काम काश्मीरमधील युवकांना सीमारेषेच्या पलीकडे पाठवून त्यांना गोरील्ला लढाईचे ट्रेनिंग देणे हे आहे. टीआरएफच्या संस्थापकांमध्ये हाफिज मुहम्मद सईद, झकीउर रहमान लखवी आणि काश्मीरचे रहिवासी शेख सज्जाद गुल यांचा समावेश आहे.
Pahalgam Terror Attack: किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना? दहशतवाद्यांचे लादेन कनेक्शन? वाचा सविस्तर…
दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, दिल्ली आणि देशातील महत्वाच्या शहरांसह कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुण्यात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.