Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत एसटी कर्मचारी महेश लोलेंच्या शरिरावर कोणत्याही जखमा नाहीत; पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा

दादर पोलीस ठाण्यात लोले यांच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. महेश लोले चार दिवसांपूर्वीच मुंबईत आले होते अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. त्यांच्या सहकार्याने दिलेल्या माहितीनुसार ते काल आझाद मैदान किंवा आंदोलन स्थळी गेले नव्हते. त्यांच्या मृतदेहावर कोणत्याही पद्धतीच्या जखमा आढळून आल्या नाहीत.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 09, 2022 | 01:14 PM
मृत एसटी कर्मचारी महेश लोलेंच्या शरिरावर कोणत्याही जखमा नाहीत; पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा
Follow Us
Close
Follow Us:

शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे अचानक आंदोलन करत हल्ला केला. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. काल रात्री वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, कालच्या आंदोलनातील महेश लोले या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आगारातील कर्मचारी असल्य़ाचे बोलले जात आहे. कालपासून महेश लोले यांच्यावर उपचार सुरु होते, आणि आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

एसटी कर्मचारी महेश लोले कोण होते

दादर पोलीस ठाण्यात लोले यांच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. महेश लोले चार दिवसांपूर्वीच मुंबईत आले होते अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. त्यांच्या सहकार्याने दिलेल्या माहितीनुसार ते काल आझाद मैदान किंवा आंदोलन स्थळी गेले नव्हते. त्यांच्या मृतदेहावर कोणत्याही पद्धतीच्या जखमा आढळून आल्या नाहीत. महेश लोले यांना दारूचे व्यसन होतं त्यांनी नशामुक्त केंद्रात काही कालावधी घालवला असल्याची माहिती समोर येत आहे. लोले यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून कुटुंबीय मुंबईत येत आहे. कुटुंबियांच्या समोर लोले यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्यातरी त्यांच्या मृत्यूचं कोणतंही संशयास्पद कारण आढळून येत नाहीये तरी पोलिसांना शविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे.

घडलेल्या या ह्ल्ल्यामागे सूत्रधार कोण याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत. दरम्य़ान ज्या आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आंदोलन करत होते. त्या आझाद मैदान बाहेर काढले असून, या सर्व कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार यांच्या घरी हल्ला करत, आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो आंदोलक सहभागी होते. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत बाचाबाची झाली तसेच पोलिसांनी आंदोलनकांना पागविण्यासाठी लाठीचार्ज केला होता. याच आंदोलनातील महेश लोले या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आगारातील कर्मचारी असल्य़ाचे बोलले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंनद व्यक्त करत गुलाल उधळला होता. पेढे वाटले होते. त्यानंतर आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले होते. मग त्यानंतर अचानक आंदोलन आणि हल्ला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या आंदोलनामागे कोण सूत्रधार आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. आंदोलकांना कोणी भडकावले, कोणी चिथावणीखोर वक्तव्य केले याचा शोध सुरु आहे.

Web Title: Dead st worker mahesh lole dont have any injury on his body says police nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2022 | 12:56 PM

Topics:  

  • maharashtra
  • supriya sule

संबंधित बातम्या

अन्वेषणाचा नवा युग! महाराष्ट्र साहसी पर्यटन आराखड्याचे विश्लेषण; बंजी जंपिंगसारख्या खेळांना मोठी मागणी
1

अन्वेषणाचा नवा युग! महाराष्ट्र साहसी पर्यटन आराखड्याचे विश्लेषण; बंजी जंपिंगसारख्या खेळांना मोठी मागणी

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत
2

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत

Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर…; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
3

Cabinet Meeting : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर…; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित
4

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.