Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत

राष्ट्रीय हरित लवादाने माथेरानमधील घोड्यांच्या लिदीमुळे वाढलेल्या प्रदूषणावर आक्षेप घेत अश्वपाल संघटना व नगर परिषदेला दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2026 | 06:34 PM
National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत

Follow Us
Close
Follow Us:

माथेरान : राष्ट्रीय हरित लवादाने माथेरान मधील घोड्यांचे लीदबद्दल अश्वपाल संघटना आणि माथेरान नगर परिषदेला उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्याचे मूदत दिली आहे.माथेरान मधील धुळ,हवा,पाणी आणि वायू प्रदूषण बद्दल राष्ट्रीय हरित लवाद कडून आक्षेप नोंदवले असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी आग्रह व्यक्त केला जात आहे.

माथेरान येथे घोड्यांच्या लिदीमुळे येथील हवा, पाणी व माती सर्वच प्रदूषित असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जानेवारी महिन्यात राष्ट्रीय हरित लवाद येथे सादर केला आहे.हा अहवाल रायगड जिल्ह्यातील लोणेर माणगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ यांनी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केला आहे.माथेरान येथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणारे उद्योग धंदे नाहीत पेट्रोल ची वहाने नाहीत तरीदेखील येथील प्रदूष्णाची पातळी धोकादायक स्टेजवर आली आहे ती कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण च्या अहवालात घोड्यांची संख्या कमी करणे, घोड्यांचे तबेले माथेरान पर्यावरण दृष्टया संवेदनशील क्षेत्राच्या बाहेर हलविणे व घोड्यांचे मार्ग निश्चित करणे अश्या महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

त्यानुसार 24 मार्च रोजी राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायालयात अश्वपाल संघटना आणि माथेरान नगरपरिषदेला उत्तर सादर करण्यासाठी न्यायाधीश डी के सिंग यांनी दोन आठवड्याची मुदत दिली आहे.माथेरान हें पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याने येथील पर्यावरण उध्वस्त होऊ नये आणि शहर प्रदूषण मुक्त असावे यासाठी सुनील शिंदे आणि केतन रामाने यांनी याचिका दाखल केली आहे.ॲड तुषार कुमार यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली, ॲड दिपाली वैद्य गोंधळेकर यांनी नगरपरिषदेची तर ॲड दीपाली बागला यांनी अश्वपाल संघटनेची बाजू मांडली पुढील सुनावणी नऊ जून 2026 रोजी होणार आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) सादर केलेल्या अहवालानुसार, माथेरानमध्ये घोड्यांच्या लिदीमुळे हवा, पाणी आणि माती या तिन्ही घटकांचे प्रदूषण होत आहे. विशेष म्हणजे, येथे कोणतेही औद्योगिक प्रकल्प किंवा पेट्रोल-डिझेल वाहने नसतानाही प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर पोहोचल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल रायगड जिल्ह्यातील Dr. Babasaheb Ambedkar Technological University यांनी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केला आहे. त्यामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय सुचविण्यात आले आहेत.

यामध्ये विशेषतः:

माथेरानमधील घोड्यांची संख्या मर्यादित करणे

घोड्यांचे तबेले पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाहेर हलविणे

घोड्यांच्या वाहतुकीसाठी ठरावीक मार्ग निश्चित करणे

अशा उपाययोजना तातडीने राबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

NGT च्या या हस्तक्षेपामुळे माथेरानमधील पर्यावरण संवर्धनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन, अश्वपाल आणि नागरिकांनी एकत्रितपणे उपाययोजना केल्यासच या प्रसिद्ध पर्यटनस्थळाचे पर्यावरणीय संतुलन राखता येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Ngt matheran pollution horse dung notice two weeks reply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • maharashtra
  • Matheran

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली तारीख
1

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली तारीख

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा, जाणून घ्या काय म्हणाले
2

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा, जाणून घ्या काय म्हणाले

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी
3

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

पुण्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे आवाहन
4

पुण्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.