Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संत तुकाराम पालखी सोहळ्यासाठी खास छत्री; यंदा थेट चेन्नईहून मागवली छत्री

संत तुकाराम महाराज यांनी पालखी लवकरच देहूमधून प्रस्थान करणार आहे. पालखीसाठी खास परराज्यातून छत्री मागवण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 26, 2024 | 02:58 PM
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी खास चैन्नईहून छत्री

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी खास चैन्नईहून छत्री

Follow Us
Close
Follow Us:

देहू : आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 28 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे. त्यामुळे देहूमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. पालखीचे घोड तयार झाले असून रथ देखील दुरुस्ती करण्यात आला आहे. पालखीला आणि मंदिर परिसराची स्वच्छता तसेच सजावट केली जात आहे. दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी विशेष छत्री तयार करुन घेण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण पालखीवेळी छत्री धरण्यात येते. या पालखीवर धरलेल्या छत्रीमुळे पालखी अगदी लांबूनही शोभून दिसते. यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 339 वे वर्ष आहे. त्यामुळे पालखी व्यवस्थापकांकडून खास तयारी केली जात आहे. पालखीसाठी यावेळी परराज्याहून खास छत्री मागवण्यात आली आहे. चैन्नईमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी छत्री बनवून घेण्यात आली आहे. या छत्रीवर आकर्षक कलाकुसर व नक्षीकाम करण्यात आले आहे.

खास कारागिरांकडून कलाकुसर

संत तुकाराम महाराज संस्थानसाठी ही छत्री पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास तयार करून घेतली आहे. या छत्रीसाठी खास वेलवेटचे कापड वापरण्यात आले आहे. चेन्नई येथील विशेष कारागिरांकडून तयार करून घेतली आहे. यासाठी छत्रीवर हाताने संपूर्ण कारागिरी केलेली आहे. यामुळे यंदा पालखी सोहळ्यात ही छत्री एक आगळे वेगळे लक्षवेधी ठरणार आहे.

Web Title: Decorative special umbrella ordered from chennai for sant tukaram maharaj palkhi sohala 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2024 | 02:58 PM

Topics:  

  • Palkhi Sohala 2024
  • saint dnyaneshwar
  • Saint Tukaram Maharaj Palkhi

संबंधित बातम्या

तुकोबा पालखीचे आळंदीत उत्साहात स्वागत; फटाक्यांची आतिषबाजी, परिसर झाला भक्तिमय
1

तुकोबा पालखीचे आळंदीत उत्साहात स्वागत; फटाक्यांची आतिषबाजी, परिसर झाला भक्तिमय

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?
2

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?

Ashadhi Wari 2025: ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष; श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
3

Ashadhi Wari 2025: ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष; श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पाऊले चालती पंढरीची वाट! जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान…
4

पाऊले चालती पंढरीची वाट! जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.