हरिनामाच्या गजरात , टाळ- मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळण्यात दंग झालेले वारकरी आणि अंभगांच्या स्वरात चिंब झालेले प्रेक्षक अशा भक्तिमय वातावरणात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा पार पडला.
दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक चेहरा भेटीला येणार आहे. हा भव्य- दिव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय.
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असलेल्या माऊलींनी मराठी भाषेत ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ लिहून वेद-उपनिषदांचे गूढ सामान्यजनांसाठी उलगडले. त्यांनी ‘अमृतानुभव’ ग्रंथातून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले.
संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
५ मार्च घटना २०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला. १९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले. १९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल…