Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोगस कागदपत्रांद्वारे शेतकऱ्यांसह बांधकाम व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक; वाकड पोलिसांत गुन्हा दाखल

जयंत कनेरिया यांनी मोहन कलाटे व धीरजलाल हंसलिया या संचालकांना हाताशी धरून संचालकपदाचा गैरवापर करत बनावट ठराव करून विस्त्रा आणि मोतीलाल ओसवाल वित्तीय कंपन्यांसोबत दोन गहाणदस्त करुन 114 कोटी रुपये कर्ज घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2023 | 04:57 PM
बोगस कागदपत्रांद्वारे शेतकऱ्यांसह बांधकाम व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक; वाकड पोलिसांत गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिक आणि शेतकर्‍यांची तब्बल 114 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud of Crores of Rupees) करण्यात आली. त्या प्रकरणी एन्वायरंट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जयंत वल्लभदास कनेरिया, मोहन पांडुरंग कलाटे, धीरजलाल गोरधनदास हंसलिया, मॉन्ट वर्ट बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नीरज कुमार असोसिएटस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निखिल वल्लभदास कनेरिया, नीरज जयंत कनेरिया, कुमार रणजीत निम्हण आणि पवन कंकालिया आणि वित्तीय संस्था विस्त्रा आयटीसी इंडिया व मोतीलाल ओसवाल रियल इस्टेट इन्वेस्टर यांच्यावर शिवाजीनगर प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशावरून वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे वकील ॲड. सत्यजित काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला प्रमुख उपस्थिती ॲड. सत्यजित काकडे, ॲड. किरण शिंदे, प्रगतशील शेतकरी स्वप्निल कलाटे, रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे, सचिव रविराज काळे आदी यावेळी उपस्थित होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयंत कनेरिया यांनी स्वतःच्या मुलाच्या व भावाच्या नावे मॉन्ट वर्ट बिल्डर्स प्रा. लि आणि नीरज कुमार असोसिएट्स प्रा. लि. दोन कंपन्या स्थापन करून स्वतः संचालक असलेल्या एन्वायरंट डेव्हलपर्स प्रा. लि कंपनीच्या सर्व्हे क्रमांक 277 मध्ये पॅनोरमा प्रकल्पाकरिता 44 कोटी 40 लाख आणि सर्व्हे क्रमांक 195/1 व 196/3 मध्ये वेदांता प्रकल्पाकरिता 12 कोटी 30 लाख रूपये प्रकल्प निधी उभारण्याचे प्रायोजनाची तरतूद केली होती.

दोन्ही प्रकल्पांसाठी लागणारे एकूण रक्कम 56 कोटी 70 लाख विस्त्रा व मोतीलाल ओसवाल या वित्तीय कंपन्यांनी देण्याची कबूल केले होते. जयंत कनेरिया यांनी मोहन कलाटे व धीरजलाल हंसलिया या संचालकांना हाताशी धरून संचालकपदाचा गैरवापर करत बनावट ठराव करून विस्त्रा आणि मोतीलाल ओसवाल वित्तीय कंपन्यांसोबत दोन गहाणदस्त करुन 114 कोटी रुपये कर्ज घेतले. जयंत कनेरिया यांनी स्वतःच्या मुलाच्या व भावाच्या दोन कंपन्यांमध्ये 57 कोटी 90 लाख रुपये परस्पर वर्ग केले.

याप्रकरणी संचालक संजय पांडुरंग कलाटे आणि शेतकरी वसंत कलाटे यांची कोणतीही संमती न घेता दोन परस्पर गहाणदस्त केले. जेव्हा जयंत कनेरिया, धीरजलाल हंसलिया आणि मोहन कलाटे या संचालकांना सर्व्हे क्रमांक 277 व सर्व्हे क्रमांक 195/1 आणि 196/3 मिळकतीच्या विकसनबाबत विचारणा केली. तेव्हा दोन्ही गहाणदस्त संचालक संजय कलाटे व शेतकरी वसंत कलाटे यांच्यापासून दस्त अस्तित्वात आल्यापासून लपवून ठेवण्यात आले. याबाबत वेळोवेळी विचार केला असता माहिती देणे टाळाटाळ करण्यात आली.

Web Title: Defrauding builders including farmers of crores through bogus documents a case has been registered in wakad police nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2023 | 04:57 PM

Topics:  

  • Crores of Rupees
  • Pimpri
  • Pimpri Chinchwad
  • Pimpri News

संबंधित बातम्या

तुम्हीही पेपर कपमध्ये चहा पिता का? आरोग्यासाठी ठरते घातक; कारण…
1

तुम्हीही पेपर कपमध्ये चहा पिता का? आरोग्यासाठी ठरते घातक; कारण…

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक
2

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल
3

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.