Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ACB च्या कारवाईनंतर आयुक्तांचा दणका; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे निलंबित

३८ लाखांच्या टेंडर फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी टक्केवारी मागणाऱ्या ओभासे यांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तात्काळ निलंबित केले असून, त्यांच्याविरोधात थेट विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या कारवाईने महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 05, 2026 | 03:01 PM
ACB च्या कारवाईनंतर आयुक्तांचा दणका; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे निलंबित

ACB च्या कारवाईनंतर आयुक्तांचा दणका; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे निलंबित

Follow Us
Follow Us:
  • १९ हजारांच्या लाचखोरी प्रकरणात मुख्य अभियंता निलंबित
  • आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची कठोर कारवाई
  • १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश
पिंपरी : अवघ्या १९ हजार रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओभासे अखेर प्रशासकीय कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. ३८ लाखांच्या टेंडर फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी टक्केवारी मागणाऱ्या ओभासे यांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तात्काळ निलंबित केले असून, त्यांच्याविरोधात थेट विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या कारवाईने महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पुणे पथकाने केलेल्या पडताळणीत ओभासे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात २९ ऑक्टोबर रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर, अटकेच्या दिवसापासून म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२६ पासून हे निलंबन लागू करण्यात आले आहे.

१५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार ओभासे यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू केली जाणार आहे. आयुक्तांनी १५ दिवसांच्या आत त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, त्यानंतर चौकशी अधिकारी आणि सादरकर्ता अधिकारी यांची नियुक्ती तातडीने केली जाईल.

हे सुद्धा वाचा : पोलिसांना पाहताच आरोपीने उगारला लोखंडी टिकाव, मुकुंदनगरात थरारक प्रकार; पाच कर्मचारी जखमी

निलंबन काळातील अटी व शर्ती

निलंबनाच्या कालावधीत ओभासे यांना नियमानुसार केवळ निर्वाहभत्ता दिला जाईल. यादरम्यान त्यांना कोणतीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेतील ‘वर्ग-१’ दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरील या थेट कारवाईमुळे पालिकेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयीन प्रक्रिया आणि विभागीय चौकशीचा अंतिम निष्कर्ष येणे अद्याप बाकी आहे.

हे सुद्धा वाचा : आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले?

    Ans: महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओभासे यांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निलंबित केले आहे.

  • Que: प्रमोद ओभासे यांच्यावर किती रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे?

    Ans: ३८ लाख रुपयांच्या टेंडर फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

  • Que: ओभासे यांच्याविरोधात पुढील कोणती कारवाई करण्यात येणार आहे?

    Ans: त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार असून, १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation chief engineer pramod obhase has been suspended nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Bribe News
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Mugdha Murder Mystery: घरच्यांपासून लपवून गहुंजेच्या आलिशान सोसायटीत वास्तव्य; लंडनहून आलेल्या तरुणीचा दुर्दैवी अन् रहस्यमय अंत!
1

Mugdha Murder Mystery: घरच्यांपासून लपवून गहुंजेच्या आलिशान सोसायटीत वास्तव्य; लंडनहून आलेल्या तरुणीचा दुर्दैवी अन् रहस्यमय अंत!

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश
2

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांचा धडाका; रस्ते, पदपथ, नाले अन् रुग्णालयांच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी
3

पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांचा धडाका; रस्ते, पदपथ, नाले अन् रुग्णालयांच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश
4

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.