Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामांचा बोजवारा; पावसाळ्यापूर्वी प्रशासन झोपेतच! पालिका आयुक्तांची भेट घेऊन मांडल्या समस्या

पावसाळा तोंडावर असतानाही नागरी कामे रखडल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 05, 2026 | 09:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नीता परब, मुंबई : पावसाळा तोंडावर आलेला असतानाही मतदारसंघातील अत्यावश्यक नागरी कामे रखडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय दिना पाटील यांनी थेट मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची मंगळवारी भेट घेत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाळ्यात हालअपेष्टा सहन कराव्या लागणार का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Shivsena News: शिवसेनाचे LIC मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन; मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप

समस्यांचा वाचला पाढा

दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण झालेली नाहीत. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा व अडथळे अद्यापही मोठ्या प्रमाणात कायम असून, यामुळे पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला. पावसाळा सुरू झाल्यावरच कामे करण्याची पालिकेची सवय झाली आहे का? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. यासोबतच रस्त्यांची दुरवस्था हा आणखी एक गंभीर मुद्दा त्यांनी मांडला. अनेक ठिकाणी खड्ड्यांनी रस्त्यांची िबकट िस्थती झाली असून, अपूर्ण कामांमुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. पावसाळ्यापूर्वीच ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही ती प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रस्त्यांवर पाणी साचण्याच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्यास अपघात आणि वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

डंम्िपंग ग्राउंड समस्येवर कायमस्वरुपी उपाययाेजना करा

रस्त्यांवर जीव वाचवण्याची मोहीम; KIMS Hospitals, ठाणे आणि Thane Traffic Police यांचे CPR प्रशिक्षण अभियान

मुलुंड, कांजुरमार्ग व देवनार डंम्िपंग ग्राऊंड परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. विशेषतः देवनार डंपिंगमुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी े केली. स्थानिक नागरिक वर्षानुवर्षे त्रास सहन करत आहेत, मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या सर्व मुद्द्यांची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात कामे कितपत गतीने पूर्ण होतील याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. पुढील आठवड्यात त्या स्वतः संबंधित भागाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती कामे पूर्ण करण्यात पालिका अपयशी ठरत असल्याचे सातत्याने समाेर येत अाहे. याबाबत जर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या पावसाळ्यात मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणी तुंबणे, वाहतूक कोंडी व आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार, असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Delegation meets municipal commissioner to present grievances

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • Dumping Ground

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.