Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indapur News: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रस्त्यांवर झेंडू बहरला; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Dussehra News: पाऊस ओसरल्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू बाजारात आणला, परंतु अचानक झालेल्या आवकीमुळे दर खाली आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2025 | 07:58 PM
Indapur News: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रस्त्यांवर झेंडू बहरला; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
Follow Us
Follow Us:

इंदापूर/सिद्धार्थ मखरे: विजयादशमी, दसरा आणि झेंडूची फुले यांचे समीकरण असल्यामुळे दसरा सणाच्या पूर्वसंध्येला इंदापूर शहरातील मुख्य मार्गांवर केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या राशी पडल्या आहेत. सणासाठी झेंडूची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असली तरी यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळू शकला नाही.

गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकरी फुले विक्रीसाठी बाजारात आणू शकले नाहीत, तर भिजलेल्या फुलांना कवडीमोल दर मिळत होता. पाऊस ओसरल्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू बाजारात आणला, परंतु अचानक झालेल्या आवकीमुळे दर खाली आले. झेंडूला ७० रुपयांना किलो तर १०० रुपयांना दीड किलो या दराने विक्री झाली. यामुळे खर्च भागवणे कठीण झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

“पावसामुळे बरीच फुले शेतातच नासली, उरलेली बाजारात आणली तरी ७०–१०० रुपयांचा दर मिळतोय. मेहनतीला न्याय मिळत नाही,” असे शेतकरी अशोक घोडके यांनी सांगितले. तर “दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात आवक झाली, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे दर टिकला नाही. ग्राहकांची मागणी जरी होती तरी पुरवठा खूप वाढल्याने भाव कमी झाले,” असे विक्रेते निहाल बागवान यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे गुलाब, शेवंती, आस्टर, गुलछडी आदी फुलांना समाधानकारक भाव मिळाला. दसऱ्याच्या मुहूर्तावर गोंडे, तोरणासाठी लागणारी पाने आणि झेंडूच्या माळा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. एकीकडे सणाचा उत्साह शिगेला असताना दुसरीकडे झेंडूला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी निराश झालेले दिसले.

Web Title: Demand for marigold flowers drops on the eve of dussehra farmers disappointed indapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Dussehra
  • farmer
  • indapur news

संबंधित बातम्या

The India Story Teaser: ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ चा दमदार टीझर प्रदर्शित; रोजच्या आहारातील ‘स्लो पॉइझन’ उलगडणार
1

The India Story Teaser: ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ चा दमदार टीझर प्रदर्शित; रोजच्या आहारातील ‘स्लो पॉइझन’ उलगडणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात
2

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात

Amravati News: ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणींना पूर्णविराम! शेतकऱ्यांना दिलासा; आता बांधावरच होणार प्रत्यक्ष पीक पाहणी
3

Amravati News: ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणींना पूर्णविराम! शेतकऱ्यांना दिलासा; आता बांधावरच होणार प्रत्यक्ष पीक पाहणी

बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, तब्बल 36585 कोटींची आर्थिक तरतूद
4

बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, तब्बल 36585 कोटींची आर्थिक तरतूद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.