Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: परतीच्या प्रवासात ट्रॅफिकचे ‘विघ्न’; दुहेरी वाहतुकीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी

Ratnagiri: सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी इंदापूर ते कोसिंबळे दरम्यानच्या मार्गावर वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 03:09 PM
kokan ganeshotsav 2026

kokan ganeshotsav 2026

Follow Us
Follow Us:
  • कोकणकरांच्या परतीच्या प्रवासात ‘महा-कोंडी’ 
  • इंदापूर-कोसिंबळे मार्गावर वाहनांच्या १० किमी लांब रांगा
  • वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला
Ratnagiri/Ganeshotsav: गणेशोत्सवाचा उत्साह आणि बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तळ कोकणातील लाखो चाकरमानी आता परतीच्या मार्गावर निघाले आहेत. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर परिसरात लागलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांच्या वाहनांना मोठा ब्रेक लागला आहे. ऐन परतीच्या प्रवासात आलेल्या या विघ्नामुळे प्रवाशांसह कोकणातील त्यांच्या नातेवाईकांचाही जीव पार टांगणीला लागला आहे.

मुंबईच्या दिशेने निघालेले आपले आप्तस्वकीय सुखरूप पोहोचतात की नाही, याची चिंता घरच्यांना सतावत असून फोनवरून सातत्याने चौकशी सुरू आहे. इंदापूर परिसरात वाहतूक पोलीस आणि शासकीय यंत्रणा ही कोंडी सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असली, तरी हा महामार्ग कधी मोकळा होणार, याचीच प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे. वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याचे मुख्य कारण म्हणजे एकाच मार्गावरून दोन्ही बाजूंची दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

मुंबईकडे जाणारी वाहने एकाच वेळी तीन ते चार रांगांमध्ये घुसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. काही ठिकाणी तर वाहने तासन् तास जागची हलतच नव्हती. सर्वात गंभीर बाब म्हणजे या भीषण कोंडीत काही आपत्कालीन रुग्णवाहिकाही अडकून पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना पुढे जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक कमालीचे हवालदिल झाले होते. प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी इंदापूर ते कोसिंबळे दरम्यानच्या मार्गावर वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांसोबतच माणगाव व महाडच्या दिशेने जाणाऱ्या स्थानिक वाहनचालकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

सणासुदीच्या काळात रस्त्यावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने आणि त्या तुलनेत नियोजन नसल्याने ही समस्या उद्भवली. वाहने एकमेकांच्या अगदी जवळ ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे तासनतास प्रवाशांना एकाच जागी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे चाकरमान्यांच्या आनंदी प्रवासाचा हिरमोड झाला असून महामार्गावरील दुरवस्थेबाबत संताप व्यक्त होत आहे. वाहतुकीची कोंडी वाढत असतानाच काही घाईगर्दी करणाऱ्या बेशिस्त वाहनचालक नियम धाब्यावर बसवून ओव्हरटेकिंग सुरू केले. ओव्हरटेकिंगच्या या प्रयत्न रस्त्यावरील गोंधळात आणि कोंडीत आणखीच भर पडली.

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Web Title: Mumbai goa highway indapur 10 km traffic jam in ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • indapur news
  • Mumbai Goa Express Way
  • traffic jam

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
1

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष
2

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट कोपरखैरण्यात; २० फूट प्रतिकृतीने वेधलं लक्ष

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
4

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.