Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET पेपरफुटीचे प्रकरण; ९ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, SIT चौकशीची मागणी

राज्यातील टीईटी परीक्षेच्या पारदर्शकता, गोपनीयता आणि एकूणच विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हजारो परिक्षार्थींच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 29, 2025 | 07:57 PM
TET पेपरफुटीचे प्रकरण; ९ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, SIT चौकशीची मागणी
Follow Us
Follow Us:

टीईटी परीक्षेच्या विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह
हजारो परिक्षार्थींच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर
सखोलो चौकशीची केली जातेय मागणी

पुणे: राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दि. २३ रोजी एकूण ३७ जिल्ह्यांमध्ये १ हजार ४२३ परीक्षा केंद्र झाली मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व राधानगरी येथील परीक्षा केंद्रांवर पेपरफुटीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालय व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने कारवाई करत पेपरफुटीचा प्रयत्न करणाऱ्या ९ जणांच्या टोळीवर गुन्हा (Crime) दाखल केला आहे. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र अध्यक्ष कांबळे संदीप यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे राज्यातील टीईटी परीक्षेच्या पारदर्शकता, गोपनीयता आणि एकूणच विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हजारो परिक्षार्थींच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२५ रोजी परीक्षा परिषदेने दिलेल्या सूचनांचा संदर्भ देत, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

महा TET परीक्षा झाली सुरळीत! ‘या’ दोन केंद्रावर आठ उमेदवारांची हकालपट्टी, पारदर्शकतेवर भर

पेपरफुटी प्रकरणात एजंटांकडे आढळून आलेले कोरे चेक, मार्क मेमो व इतर कागदपत्रांमध्ये नमूद उमेदवारांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या गुन्ह्यात सहभागी उमेदवार शिक्षक असतील तर त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे, या कडे लक्ष वेधण्यात आले आहे.

परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी ओएमआर शीट जाणीवपूर्वक कोरी सोडल्याच्या संशयावरून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. अशा गैरप्रकारात दोषी आढळलेल्या उमेदवारांवर पुढील परीक्षांना बंदी घालावी, तर संबंधित व्यक्ती शिक्षक असल्यास त्यांना निलंबित करण्यात यावे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. अंतिम निकाल व प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. ही संपूर्ण बाब टीईटी परिक्षार्थींच्या भवितव्याशी निगडित असल्याने परीक्षेच्या प्रतिष्ठा व पारदर्शकतेसाठी कठोर व तातडीची कारवाई करण्याची जोरदार मागणी विविध शिक्षक संघटना व विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.

Maharashtra News : शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रांची तपासणी; ५०६२ उमेदवारांची उपस्थिती तर २४६ अनुपस्थित

टीईटी पेपर फोडताना टोळी जेरबंद करण्यात आली असून त्याचे धागेदोरे पूर्ण राज्यात असण्याची शक्यता पोलिस प्रशासन वर्तवली असल्याने एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी करण्याची मागणी असून टीईटी परीक्षाचा निकाल जाहीर करताना परीक्षा परिषदेने सूचना काढावेत की, ओएमआर सीट जपून ठेवावी. ती पडताळूनच निकाल जाहीर करण्याची अट घालावी व तो निकाल तात्काळ जाहीर करण्यात यावा.

-कांबळे संदीप अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र

 

Web Title: Demand for sit inquiry into tet paper leak case kagal and radhanagari education marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 07:57 PM

Topics:  

  • education
  • SIT Enquiry
  • TET

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
2

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
3

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
4

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.