फोटो सौजन्य - Social Media
परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV बसवण्यात आले होते. तसेच यंदा नवीन तंत्रज्ञान म्हणजेच बायोमॅटिक तसेच AI चा वापर करून गैरप्रकार थांबवण्यात यश हाती आलेले दिसून येत आहे. उमेदवारांचे ओळखपत्र, फोटो तसेच इतर काही सुरक्षेच्या गोष्टी तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्यात आला होता.
नांदेड आणि बीड, या जिह्ल्यातील अशा दोन परीक्षा केंद्रावर आठ उमेदवार हाकलण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या समवेक्षकांचीही चौकशी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकार टाळण्यासाठी परिषद Active मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परीक्षा सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. तसेच परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत झाल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.
शिक्षकांमध्ये असंतोष…
दरम्यान, यंदाची महा TET परीक्षेकडे अनेकांचे लक्ष लागून होते. कारण राज्यभरातील पहिली ते आठवी माध्यमांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आता TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होते. २०२७ पर्यंत जे शिक्षक TET पात्र करू शकणार नाहीत त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार येईल आणि हातची नोकरी हातातून जाण्याचीही अफाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या TET परीक्षेत आधीपासून सेवेत रुजू असणारे शिक्षकही मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत.






