
सांगोला तालुक्यातील नागरिकांनी गणपतराव देशमुख यांना अकरा वेळा विधानसभेवर पाठवून या भागातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या मार्फत शासनाकडून न्याय मिळवून देण्याची मोठी कामगिरी करून घेतली असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी सांगितले.
गणपतराव ‘वन मॅन आर्मी’
विरोधी पक्षात असताना आम्ही एकलव्य म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडून खूप शिकलो. मंत्री पद गेल्यावर शासकीय वाहन सोडून एसटीने जाणारे नेते, सभागृह सुरू व्हायच्या अगोदर प्रथम येणारे आणि सभागृह संपल्यावर शेवटी जाणारे, एकही दिवस सुट्टी न घेणारे आमदार, वन मॅन आर्मी म्हणजे गणपतराव अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली.
[blockquote content=” शेतकरी कामगार व वंचित घटकाबद्दल सातत्याने त्यांचे प्रश्न मांडून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणारे गणपतराव देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद अाहे. दुष्काळी भाग असला तरी मानाने कसे जगायचे, ही कार्यपद्धती त्यांनी या भागातील लोकांच्या अंगी रुजविली. ” pic=”” name=”खासदार शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री”]