Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीडच्या उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

माजलगाव नंतर बीड एसीबीने आता थेट लाचखोर अधिकाऱ्याला दणका दिला आहे, दहा हजार रुपायांची लाच घेताना महिला अधिकारी भारती सागरे यांच्यासह अन्य एकास रंगेहाथ पकडले असून, एसीबीने ही कारवाई बीड तहसील परिसरात केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2024 | 11:21 AM
बीडच्या उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
Follow Us
Close
Follow Us:

बीड : माजलगाव नंतर बीड एसीबीने आता थेट लाचखोर अधिकाऱ्याला दणका दिला आहे, दहा हजार रुपायांची लाच घेताना महिला अधिकारी भारती सागरे यांच्यासह अन्य एकास रंगेहाथ पकडले असून, एसीबीने ही कारवाई बीड तहसील परिसरात केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी १० हजार रूपयांची लाच मागितली होती. ही लाच एका निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी तीन वाजता सुमारास भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागात दोन कारवाया झाल्याने खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे गावातीलच तलावात गेले होते. त्याचा ५ लाख ३८ हजार ९६५ रूपये एवढा मावेजा मिळावा, यासाठी भूसंपादन विभागाकडे अर्ज केला होता. परंतू सागरे यांनी हा अर्ज निकाली काढण्यास टाळाटाळ करत दहा हजार रूपयांची लाचही मागितली. यावर पाच दिवसांपूर्वी संबंधिताने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने गुरूवारी दुपारी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला.

विशेष म्हणजे सागरे यांनीच वसूलीसाठी नेमलेला सेवा निवृत्त मंडळाधिकारी नवनाथ प्रभाकर सरवदे (रा. अंबाजोगाई) याच्याकडे लाच देण्यास सांगितले. लाचेची रक्कम स्विकारताच एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, प्र. अपर पोलिस अधीक्षक राजीव तळेकर, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड, सहायक सापळा अधिकारी अमोल धस, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, भारत गारदे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे, सत्यनारायण खेत्रे आदींनी केली.

सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

माजलगावच्या उपविभागीय कार्यालयातील लिपीक वैभव जाधव व अशपाक शेख या दोघांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना बुधवारी पकडले होते. यातही माजलगावच्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना संशयाच्या भोवऱ्यात आहेत. एसीबीने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Web Title: Deputy collector of beed in the net of acb he was caught red handed while accepting a bribe of 10000 nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2024 | 11:21 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

चक्क मेलेला माणूसच झाला जिवंत! अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या तरुणाला आला अचानक खोकला…
1

चक्क मेलेला माणूसच झाला जिवंत! अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या तरुणाला आला अचानक खोकला…

Mumbai Rain Update: गणपती विसर्जनावर पावसाचे सावट! मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम, IMD कडून महत्त्वाचा इशारा
2

Mumbai Rain Update: गणपती विसर्जनावर पावसाचे सावट! मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम, IMD कडून महत्त्वाचा इशारा

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
3

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी
4

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.