गणपती विसर्जनावर पावसाचे सावट! मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम, IMD कडून महत्त्वाचा इशारा (फोटो सौजन्य-X)
Mumbai Ganesh Visarjan news in Marathi : आज लाडक्या गणपती बाप्पाची दहा दिवस सेवा केल्यानंतर आज (6 सप्टेंबर) त्याला निरोप दिला जात आहे. गणेशोत्सव हा मुंबईसाठी एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. लाखो गणेशभक्त आज लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. एकीकडे ढोल-ताशांचा गजर तर दुसरीकडे बाप्पाच्या भक्तांच्या डोळ्यात आसवं दिसत आहे.अशा भावनिक वातावरणात गणपती बाप्पााच्या निरोप मिवरणुकीला पावसाचा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान आजही हवामान खात्याने मुंबईत पावसाचा येलो असर्ट दिला आहे.
आज पहाटपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर आकाशातही काळे ढग दाटून आले आहे.जणू काही बाप्पाला निरोप देण्यासाठी स्वत: वरुणराजा आला आहे, असं दृश्य मुंबईत पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज शनिवारी मुंबईत पावसाची तीव्रता कायम राहण्याची अपेक्षा आहे. आयएमडीनुसार, दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कायम राहील. मुंबई उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
हवामान खात्यानुसार, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पालघर जिल्ह्यात आज पावसाबाबत ऑरेंज अलर्ट लागू आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडमध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत आहे. ज्यामुळे शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.
शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० या वेळेत कुलाबा येथील आयएमडी स्टेशनमध्ये १२.४ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ वेधशाळेत ७.१ मिमी पावसाची नोंद झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांनुसार, पूर्व उपनगरात २४.८६ मिमी, बेट शहरात ९ मिमी आणि पश्चिम उपनगरात ७.१५ मिमी पावसाची नोंद झाली, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. हवालानुसार, हवामान विभागाने असाही अंदाज वर्तवला आहे की रविवारपासून पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्याची अपेक्षा आहे.