Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्कलकोट घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी

श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे प्रविण गायकवाड चालवत असलेली संघटना अनेक वर्षांपासून काम करत आहे. संस्थेच्या नावात श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे मागे छत्रपती लावण्यास प्रवीण गायकवाड यांना कोणतीच हरकत नव्हती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 15, 2025 | 03:12 PM
विदर्भात काँग्रेसला उभारी मिळणार; 'या' नेत्यांना दिली गेली महत्त्वपूर्ण जबाबदारी

विदर्भात काँग्रेसला उभारी मिळणार; 'या' नेत्यांना दिली गेली महत्त्वपूर्ण जबाबदारी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या आणि बहुजन व पीडित समाजासाठी झटणाऱ्या प्रविण गायकवाडांवर हल्ला झाला. हा हल्ला भाजपच्या गुंडांनी केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेधही करण्यात आला. अक्कलकोट घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे प्रविण गायकवाड चालवत असलेली संघटना अनेक वर्षांपासून काम करत आहे. संस्थेच्या नावात श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे मागे छत्रपती लावण्यास प्रवीण गायकवाड यांना कोणतीच हरकत नव्हती. मात्र, धर्मादाय आयुक्त कार्यालयात तशा प्रकारच्या संस्थेची नोंदणी मुळात झाल्याने, या नावात बदल करू शकत नसल्याची तांत्रिक अडचण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे केवळ निमित्त साधून, भाजप युवा मोर्च्याचा पदाधिकारी व सहकाऱ्यांनी केलेला भ्याड हल्ला निषेधार्ध असून, ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था लयाला गेल्याचे’ स्पष्ट द्योतक आहे.

अहिल्यानगरचा छिंदम, कोरटकर, सोलापूरकर, माजी राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांनी वेळोवेळी केलेला शिव छत्रपतींच्या अवमानावर व भाजप मातृ संस्थेच्या तत्कालीन नेत्यांनी श्री शंभूराजेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्यावर भाजप युवा नेते गप्प का? असा संतप्त सवालही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उपस्थित केला.

संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी, बदलापूर चिमुरडीवरील अत्याचार, अक्षय शिंदे फेक एन्कांउटर यांसारखे विषय अद्याप कायदेशीर पूर्णत्वास येत नाही. राज्यात कोयता गँग, ठाणे पोलीस स्टेशनमधील गोळीबार, महिला अत्याचार व अक्कलकोटमधील आजच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून, मुख्यमंत्री फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा तातडीने राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारावजा सल्लाही त्यांनी दिला.

राज्यातील बिघडत्या कायदा-सुव्यवस्थेविषयी व अस्मितेविषयी जराही चाड असेल तर ‘महायुतीच्या सत्तेतील’ दोन्ही पक्षांनी, फडणवीसांकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, असे आवाहन गोपाळ तिवारी यांनी केले.

Web Title: Devendra fadnavis should accept moral responsibility for the akkalkot incident and resign from the post of home minister demand of congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • akkalkot news
  • devendra fadnavis
  • political news

संबंधित बातम्या

विधानसभा निवडणुकीने उडवला धुव्वा; लालू प्रसाद यांच्याच घरात पेटला वणवा
1

विधानसभा निवडणुकीने उडवला धुव्वा; लालू प्रसाद यांच्याच घरात पेटला वणवा

नांदेडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी! ७ नगराध्यक्षपदासाठी ११७ तर १६५ नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज
2

नांदेडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी! ७ नगराध्यक्षपदासाठी ११७ तर १६५ नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र
3

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र

नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार
4

नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.