Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde Health : “मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही…”, धनंजय मुंडे यांना नेमकं झालंय तरी काय?

Dhananjay Munde Health News : मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे आजारी असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती बिघडली असून या बद्दल त्यांनी नुकतेच X माधम्यावर याबाबतीत एक पोस्ट शेअर केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 20, 2025 | 06:05 PM
Dhananjay Munde, Dhananjay Munde News

Dhananjay Munde, Dhananjay Munde News

Follow Us
Close
Follow Us:

Dhananjay Munde Health News Marathi : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. याचदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे आजार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती बिघडली असून याबद्दल त्यांनी नुकतेच X माधम्यावर याबाबतीत एक पोस्ट शेअर केली. याचदरम्यान धनंजय मुंडे यांनी प्रकृतीसंदर्भात अपडेट दिली असून धनंजय मुंडे बीडमधील कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. कॅबिनेट बैठकांना उपस्थित नव्हते. याचे कारण त्यांनी आपल्या पोस्टद्वारे सांगितले होते.

धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात? करुणा शर्मांनी घेतली बड्या नेत्याची भेट

धनजंय मुंडे यांची X वरील पोस्ट

धनजंय मुंडे यांनी X वर पोस्ट करत म्हटलं की, ” माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला… — Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 20, 2025

त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.

याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…” असं धनजंय मुंडे यांनी x वर पोस्ट करत म्हटलं आहे.

बेल्स पाल्सी म्हणजे काय?

बेल्स पाल्सीला चेहऱ्याच्या एका बाजूचा पक्षाघात असेही म्हणतात. बेल्स पाल्सी हा चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणामुळे होणारा तात्पुरता पक्षाघात आहे. हे सहसा तेव्हा घडते जेव्हा तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवणारे स्नायू सुजतात किंवा आकुंचन पावतात. असे होण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नाही. बेल्स पाल्सी झालेल्या व्यक्तीला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो. डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या किंवा अर्ध्या बंद राहतात.

या गोष्टींमुळे बेल्स पाल्सीचा धोका वाढू शकतो

  • हर्प्स सिंप्लेक्स,, ज्यामुळे थंड फोड आणि जननेंद्रियाच्या नागीण होतात
  • एचआयव्ही, जो रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचवतो
  • सारकोइडोसिस, ज्यामुळे अवयवांमध्ये सूज येते
  • हर्पिस झोस्टर विषाणू, ज्यामुळे कांजण्या आणि एक्झिमा होतो
  • एपस्टाईन-बार विषाणू, ज्यामुळे मोनोन्यूक्लिओसिस होतो

बेल्स पाल्सीची लक्षणे

जेव्हा तुम्हाला सर्दी, कानाचा संसर्ग आणि डोळ्यांचा संसर्ग होतो तेव्हा बेल्स पाल्सी बहुतेकदा एक ते दोन आठवड्यांत विकसित होतो. बेल्स पाल्सी चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना प्रभावित करते तेव्हा हे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये घडते.

‘अर्धवट बुद्धी, खोटे आरोप..’, अंजली दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

Web Title: Dhananjay munde on thursday said he has been diagnosed with bell palsy news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
1

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
2

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन
3

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल
4

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.